बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कडून पत्रकारांना सॅनिटाइझर व मास्कचे वाटप…

बालाजी तोरणे – अहमदपूर

अहमदपूर येथे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या उपस्थितीत माजी तालुकाउपाध्यक्ष माधव राठोड यांच्या पुढाकाराने तहसील कार्यालय सभाग्रहात अहमदपूर तालुक्यातील पत्रकार बांधवांना सॅनिटाईजर व मास्क चे वाटप करण्यात आले.

कोविड19 चा धोका बळावत असल्याने हा उपक्रम पत्रकार बांधवांसाठी राबवण्यात आला व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार उदयकुमार जोशी,समविचारी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सलीम सय्यद,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा अहमदपूर अध्यक्ष विश्वंभर स्वामी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजीव मोहगावकर,तालुकाध्यक्ष डॉ. मिलिंद साबळे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बलभीम पवार,रत्नाकर नळेगावकर,मारोती बुद्रुक पाटील,गजानन भुसारे,विरेंद्र पवार,सचिन कोंडलवाडे,बालाजी काळे,उदय गुंडिले,फेरोज शेख,मासुम शेख,बालाजी तोरणे,महादेव महाजन,शिवाजी गायकवाड,जगन्नाथ पुणे,वहाब मनियार, गोविंद काळे आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमास मनसेचे भुजंग उगीले,मनवीसे प्रसिद्धी प्रमुख यश भिकाणे आदीनी हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here