पालघरचे तत्कालीन प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत खंदारे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी…

राहुल पाटील – पालघर

पालघर – पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना वरील दिल्या जाणाऱ्या लसीसाठी नागरिकांना तासंतास रांगेत उभं राहावं लागत आहे अशातच अनेकांना जिल्ह्यात असलेल्या लसीचा तुटवड्यामुळे ही लस देखील वेळेत मिळत नाहीये . मात्र अशातच पालघर चे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी हे आपल्या कार्यालयातच लसीकरण करत असून हे नियमबाह्य पद्धतीने केलं जातं असल्याचा आरोप सदर प्रकार उघड करणाऱ्या पालघर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे .

या आरोपा नंतर प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी अभिजीत खंदारे यांच्यावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली असून त्यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल आहे .

मात्र ही कारवाई पुरेशी नसल्याचे सांगत त्यांच निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे . या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र देण्यात आल असून कठोर कारवाई न केल्यास येत्या काही दिवसात मनसे आपल्या स्टाइलने आंदोलन करेल असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here