Friday, September 22, 2023
Homeक्रिकेटअथर्व तायडे ह्याचे मनसे अभिनंदन व शुभेच्छा...

अथर्व तायडे ह्याचे मनसे अभिनंदन व शुभेच्छा…

अकोला – आज दि २७/५ रोजी इंडियन प्रीमियर लिग(IPL) मधील अकोला शहरातील पंजाब किंग्स टीम कडून खेळणारा स्टार खेळाडू अथर्व तायडे ह्याचे शास्त्रीनगर स्थित घरी जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी ह्यांनी स्वागत व अभिनंदन केले.ह्यावेळेस अथर्व तायडे ह्याने त्याचा क्रिकेट प्रवास व IPL मधील बरेचसे रोमांचाक किस्से सांगितले.

भारतीय क्रिकेट टीम मध्ये लवकर वर्णी लागावी व अकोला शहराचे नाव अजून मोठे करावे अश्या शुभेच्छा मनसे तर्फे देण्यात आल्या.ह्या वेळी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले,संघटक अरविंद शुक्ला,महानगर अध्यक्ष सौरभ भगत व राकेश शर्मा,

जिल्हा सह सचिव मोहन मते,शहर सचिव ऍड अजय लोंढे,उपशहर अध्यक्ष मुकेश धोंडफळे व राजेश पिंजरकर,विभाग अध्यक्ष अमोल भेंडारकर व राजेश राठी,मनविसे उपजिल्हाध्यक्ष डॉ जय मालोकार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: