अमरावतीत लॉकडाऊनला आमदार रवी राणा यांचा विरोध…विश्वासात न घेता लॉकडाऊन केला असल्याचा आरोप…

रुपाली तेलमोरे, अमरावती

अमरावती जिल्हात वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता सात दिवसाचा कडक लॉकडाऊन अमरावती शहर,अचलपूर मध्ये करण्यात आला मात्र या लॉकडाऊनला बडनेराचे आमदार रवी राणा यांनी विरोध केलाय, लॉकडाऊन पूर्वी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या अनुभवांचा विचार करणे आवश्यक होते तसे मात्र झाले नाही.

अमरावती जिल्ह्यात अचानक घोषित लॉकडाऊन मुळे गोरगरीब हातमजुरी करणाऱ्यांचे प्रचंड हाल होतं आहे, तर अमरावती मध्ये वाढती कोरोना रुग्ण संख्या व
टेस्टिंग लॅब मध्ये चालणाऱ्या घोळाची सखोल चौकशी करा,देशभरात होणारी अमरावती जिल्ह्याची बदनामी थांबवा, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत द्या,कोरोना रुग्णांवर मोफत इलाज करा..

त्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ 10000 ची मदत करा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी व्हेंटिलेटर,ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णवाहिका इतर आवश्यक साहित्य पुरेश्या प्रमाणात द्या अशी मागणी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मुख्य सचिव संजय कुमार यांना केली,

कोरोनामुळे अनेक लोक उध्वस्त झाले त्यामुळे या मध्ये कोणाचाही विचार केला गेला नाही असाही आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here