Home Marathi News Today

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण…आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक…

अमरावती:- शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी व लॉकडाऊन काळात आलेली वीज माफ करण्यात यावे यासाठी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 2 तास रस्ता रोको आंदोलन केले होते.परतीच्या पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेल आहे. शेतकऱ्याना अद्याप मदत मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे.

तर आता शेतकऱ्यांच्या हाताशी असलेले कपाशी या पिकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात बोंडे अळी आल्याने शेतकरी पूर्णता हवालदिल झालेला आहे. त्यामुळे त्रिगुणी सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करावी यासाठी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्यामार्फत सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा या झोपलेल्या सरकारला अद्यापही जाग आलेली नाही.

यासाठी स्वतः बैलगाडी मधून येत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत सरकारच लक्ष वेधले आहे. दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर यावेळी आमदार रवी राणा यांच्या सह १२८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली यावेळी राष्ट्रीय महामार्गावर टायरची जाळपोळ केली.

यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते यावेळी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्याने मी सुद्धा जेल मध्ये दिवाळी साजरी करू असा इशारा रवी राणा यांनी दिला यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर जोरदार घोषणा करण्यात आल्या

शेतकऱ्यांना जर न्याय आम्ही यापेक्षाही सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री वर करू असे बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. रवी राणा सह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून तिवसा पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाई घेऊन गेले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!