आमदार प्रकाश भारसाखळे यांनी केला आकोटकरांचा विश्वासघात…पालीकेचा निधी स्वतःचा भासवून केले विकासकामाचे भूमीपूजन…पालीकेच्या वतीने भूमीपूजन करविण्याची मविआची मागणी…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्कचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आकोट पालीकेचा निधी आमदार प्रकाश भारसाखळे यांचे कल्पनेतुन व प्रयत्नाने प्राप्त झाल्याचे भासवून करण्यात आलेले भूमीपूजन आता वादाचे भोव-यात सापडले असुन असे अनधिकृत व स्वतःचा काडीचाही संबंध नसलेले भूमीपुजन करुन आमदार भारसाखळे यानी आकोटकरांचा विश्वासघात केल्याची आकोटवासियांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

तर दुसरीकडे आमदार भारसाखळे यांच्या या पाताळयंत्री स्वभावाने संतप्त मविआ पदाधिका-यानी हे भूमिपुजन अधिकृत व पालीकेच्या वतीने करण्यात यावे अशी मागणी केली आहे.आकोट शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्कचे सौंदर्यीकरण विकास कामाचा भूमिपूजन सोहळा ३ फेब्रु. रोजी पार पडला. या कामासाठी लागणारा निधी हा न. प. फंड व पालीकेला मिळालेल्या चौदाव्या वित्त आयोग निधीमधून खर्च केल्या जाणार आहे.

त्यामूळे हा भूमीपूजन सोहळा पालीकेने करणे संयुक्तिक होते. मात्र हा सोहळा शिवजयःती ऊत्सव समिती आकोटच्या वतीने घेण्यात आला आहे. दुसरे आसे कि, या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका व जाहिरात फलकावर ” मा. श्री. प्रकाशभाऊ भारसाखळे यांच्या कल्पनेतून व प्रयत्नाने ” अशी शब्दरचना करण्यात आली आहे. या शब्दरचनेद्वारे या विकासकामाचा निधी आमदार भारसाखळे यानीच महत्प्रयासाने निधी खेचून आणल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे.

वास्तविक या कामाच्या निधीशी आमदार भारसाखळे यांचा दुरान्वयानेही संबःध नाही. तर या कामासाठी लागणारा प्रचंड निधी पालीकेच्या एकाच खात्यात नसल्याने या कामाचे हरितपट्टा विकास व अन्य निरूमाण कार्य आसे विभाजन करण्यात आले आहे. पैकी हरितपट्टा विकासासाठी पालीका फंडातुन तर आन्य निर्माणासाठी चौदाव्या वित्त आयोगाचा निधी दिला जाणार आहे. परंतु पालीका निधीचे श्रेय फुकटात लाटण्यासाठी आमदार भारसाखळे यानी हा भूमीपुजनाचा बनाव घडवून आणला आहे.

वास्तविक पालीकेचा निधी असल्याने हा भूमीपूजन सोहळा पालीका प्रशासनानेच करणे क्रमप्राप्त आहे. परंतु आज रोजी पालीकेवर प्रशासक नियूक्त आहे. त्यांचेकडून ह्या सोहळ्याचे आयोजन केले गेले असते तर ह्या सोहोळ्याला ” आमदार भारसाखळे याःची कल्पना व प्रयत्न ” यांचा आभास निर्माणच करता आला नसता.

परिणामी या सोहोळ्यात त्याना केवळ विद्यमान आमदार म्हणूनच निमंत्रीत केले गेले असते. आणि ह्या विकास कामाचे श्रेय पालीकेला चौदावा वित्त आयोग निधी देणा-या मविआ सरकार व पालीकेला मिळाले असते. हे हेरुन चाणाक्ष आमदार भारसाखळे यांच्या कुरापती कल्पनेने व प्रयत्नाने ” शिवजयंती ऊत्सव समिती आकोट ” या नावाने हा सोहोळा आयोजित केला गेला.

शिवजयंती ऊत्सव समित्याना चकविले – आकोट शहरात सद्यस्थितीत दोन समित्या शिवजयःती ऊत्सव साजरा करतात. त्यापैकी एक समिती ईंग्रजी तारखेनुसार तर दुसरी मराठी तिथीनुसार शिवजयंती ऊत्सव साजरा करते. त्यामूळे या सोहळ्याचे आयोजन या दोनपैकी नेमके कोणत्या समितीने केले? हा प्रश्न निर्माण झाला आहे. हाया ऊत्सवासाठी दोनूही समित्या लोकवर्गणी करित असतात. परंतु वर्गणी कमी अन खर्च अधिक अशी या समित्यांची दरसालची स्थिती आहे.

त्यामूळे ऊत्सव समाप्तीनंतर या समिती सदस्य, पदाधिका-याना स्वतःच्या खिशातुन वर्गणीची तुट भरुन काढावी लागते. दोन्ही समित्याना अशी आर्थिक चणचण असताना आणि लोकवर्गणीस आद्याप प्रारंभ झालेला नसताना ह्या भुमीपूजनाच्या वृत्तपत्रातील जाहिराती, शहरात लावलेले टोलेजंग बॕनर्स, मंडप, बिछायत, हारतुरे असा दिडदोन लाखाचा खर्च यातील कोणत्या समितीने केला? हा प्रश्नही चर्चील्या जात आहे.

सोबतच हे विकास काम पालीकेचे असताना या समितीने भूमीपूजन कोणत्या अधिकाराने केले? या कामाच्या निधीशी आमदार भारसाखळे यांचा सुतराम संबःध नसताना हे विकास काम त्यांच्या कल्पनेने व प्रयत्नाने होत असल्याचा जावईशोध या समितीने कोणत्या आधारावर लावला? आयोजक असल्यावरही या सोहोळ्याचे सुत्रसंचलन, प्रास्ताविक, अतिथींचे स्वागत, मनोगत कथन, आभार प्रदर्शन यासाठी या समितीचा कोणताही सदस्य आथवा पदाधिकारी का हजर नव्हता?

अशा अनेकानेक प्रश्नांची ऊत्तरे शोधली असता ध्यानात येते कि, या विकास कामाचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आमदार भारसाखळे यानी शिवजयंती ऊत्सव समिती आकोट या नावाचा मोघमपणे ऊपयोग करुन घेवून दोन्ही समित्या व आकोट नगरवासियाना चकविले आहे.

आमदारांच्या या चकव्याची पुर्वकल्पना असल्याने पालीका प्रशासक तथा ऊपविभागिय अधिकारी श्रिकांत देशपांडे व मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ हे दोघेही प्रकृती अस्वास्थ्याची सबब पुढे करुन या सोहोळ्यापासुन सुरक्षित अंतरावर राहिले. तर सारा सोहोळा भाजपमय व शिष्टाचारसंमत नसल्याने ज्यांचे शुभहस्ते भूमीपूजन ठेवण्यात आले ते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार ओमप्रकाश कडू यानीही या सोहोळ्याकडे पाठ फिरविली. यामूळे हा सोहोळा अधिकृत व शासकिय नसल्याचे अधोरेखीत झाले.

आमदाराना डावलले – या भूमीपुजन सोहोळ्यावर आपला व आपल्या पक्षाचा वरचष्मा दर्शविण्यासाठी आमदार भारसाखळे यानी आकोट शहराशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या स्वपक्षातील आमदार व अन्य नेत्याना आमंत्रित केले. परंतु जिल्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अमोल मिटकरी, शिक्षक आमदार किरण सरनाईक आणि राजकिय सुडबुद्धीने प्रेरित होऊन स्वपक्षाचेच पदविधर आमदार रणजित पाटील याना हेतुपूरस्सर डावलले. वास्तविक आकोट शहरात पदविधर आहे.

शिक्षक आहेत. जे पालीकेचा कर नियमित भरतात. होवू घातलेल्या विकास कामात या करातुन ऊभ्या झालेल्या पालीका फंडाचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. त्यामूळे शिक्षक प्रतिनिधी आमदार किरण सरनाईक व पदविधर प्रतिनिधी आमदार रणजित पाटील याना व राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी याना भूमीपूजनासाठी आमंत्रित करणे अगत्याचे होते.

पण तसे न केल्याने आमदार भारसाखळे यानी स्वपक्षातील आपल्या गटाचा प्रभाव पाडण्याच्या आणि अन्य पक्षिय आमदाराना कस्पटासमान लेखण्याच्या हिणकस प्रवृत्तीचा परिचय दिला आहे.

मविआची भूमिका – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमिपुजन सोहोळा प्रशासकिय स्तरावर नगरपरिषदेने आयोजित करावयास हवा. छत्रपती शिवराय हे कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नसुन सर्वसामान्य व प्रत्येकाच्या आयुष्याची प्रेरणा आहेत. आकोट येथिल छत्रपती शिवराय स्मारकाचा भूमीपूजन सोहोळा सर्वाना सोबत घेवून न.प. प्रशासनाचे वतीने झाला पाहिजे. छ

त्रपती शिवाजी महाराज स्मारक संपूर्ण जिल्ह्याला प्रेरणा देणारे ठरावे हाच आम्हा सर्वांचा ऊद्देश आहे. यामध्ये कुणीही कोणतेही राजकारण करता कामा नये. सर्वाना सोबत घेवून शिवरायाःचा विचार पुढे घेवून जाणे ही सर्वांची जबाबदारी आहे. अमोल मिटकरी विधान परिषद सदस्य.

छत्रपती शिवराय हे अखिल मानवजातीचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे स्मारक भूमीपुजन सोहोळ्याचे राजकारण करणे हे अतिशय लाजिरवाणे आहे. आकोट येथिल छत्रपती शिवराय स्मारक हे न.प. निधी व मविआ सरकारने दिलेल्या चौदावा वित्त आयोग निधीतुन साकार होत आहे. अशा स्थितीत हे स्मारक आपल्याच कल्पनेने व प्रयत्नाने होत आहे हे म्हणणे हास्यास्पद आहे. हे भूमीपुजन न.प. द्वारेच व्हायला हवे. अन्य कुणी हे करणे गैर आहे. त्यामूळे आकोट पालीका प्रशासनानेच हे भूमीपुजन आयोजित केले पाहिजे. राजेश भारती कार्याध्यक्ष जि. काँ. कमेटी, अकोला.

छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर कब्जा करण्याचा खेळ भाजप सःपूर्ण राज्यात खेळत आहे. तोच प्रकार आकोटात होत आहे. आमदार भारसाखळे ईतके विकासवेडे असते तर मतदार सःघातील रस्ते भकास पडले नसते. मागिल काळात त्याना कमे करुन श्रेय घेण्याचे सुचले नाही.

परंतु आता आकोट पालीकेची निवडणून दृष्टीपथात येताच त्याना अनधिकृत भूमीपुजन करुन श्रेय घेणे सुचले आहे. झालेले भूमीपुजन अधिकृत व शासकिय स्तरावर झालेले नाही. म्हणून पालीकेच्या वतीने हे भूमिपुजन होणे अगत्याचे आहे. अनिल गावंडे अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, महाराष्ट्र प्रदेश.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here