मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत प्रवेश…

न्यूज डेस्क – निवडणुकीच्या काळात भाजपा सोबत बंडखोरी करून निवडून आलेल्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शनिवारी 24 ऑक्टोबर मातोश्रीवर कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जैन यांना शिवबंधन बांधणार आहेत.

जैन या मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार आहेत. गीता जैन यांच्यासोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही नगरसेवकही प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढणार आहे.

विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी भाजपमधून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. मीरा-भाईंदरसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने शेवटी त्यांनी बंडखोर म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्या विजयी झाल्या.

निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेचा घोळ सुरू असताना त्यांनी त्यावेळचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पाठिंबाही दिला होता. नंतर सत्तेचं सगळच गणित बदललं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीतं सरकार आलं.

आत बदलती समिकरण लक्षात घेऊन त्यांनी थेट शिवसेनेतच जाण्याचा निर्णय घेतला आहे. या फायदा शिवसेनेला होणार आहे. माजी महापौर असलेल्या जैन यांचं मीरा भाईंदर मध्ये कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. विधानसभा निवडणुकीत जैन यांना शिवसेनेने मदतही केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here