रामटेक – राजु कापसे
“आमदार आपल्या गावी मुक्कामी” या आमदार आशिष जयस्वाल यांच्या अभिनव कार्यक्रम आदिवासी दुर्गम मुरडा या गावापासून सूरुवात केल्यानंतर दि.२२ जानेवारी २०२२ ला पुन्हा आदिवासी बहूल टांगला या गावी भेट दिली. तसेच ४ फेब्रूवारी रोजी टांगला या गावातील प्रत्येक नागरिकांना एक महिण्याचे रेशन धान्य मोफत वाटप करण्यात येईल
, याची हमी आ.आशिष जयस्वाल यांनी नागरिकांना दिली. यानंतर आ.जयस्वाल यांनी टांगला येथिल गावकर्यांसह स्नेहभोजन करुन गावात राञीला मुक्काम केला. “आमदार आपल्या गावी मुक्कामी” हा अभिनव उपक्रम तालूक्यातील गावा – गावापर्यंत पोहचण्याचा व शेवटच्या घटकांपर्यंत सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, कुणीही योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये हाच माझा ध्यास आहे.
गावात निवांत वेळ दिल्याने गावातील प्रत्येक व्यक्तीची ओळख होवून त्यांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्याची संधी मला मिळत आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, रेशन कार्ड,दिव्यांग लाभार्थ्यांना मदत करणे, शेतकरी मजूरांचे ई श्रम कार्ड तयार करणे,शेतकर्यांना शेती उपयोगी अवजारे देणे, असा माझा निर्धार आहे. असे आ.जयस्वाल यावेळी म्हणाले.

यावेळी शिवसेना तालूका प्रमुख विवेक तुरक,उपतालूका प्रमुख देवानंद वंजारी,युवासेना उपजिल्हा प्रमुख कमलेश शरणांगत,ग्रां.पं.टांगला येथिल सरपंच गयाप्रसाद कोवाचे,समाजसेवक बंडु सांगोडे, अमोल खंते,ग्रा.पं.खनोरा सरपंच ईमरचंद भलावी,ग्रा.पं.हिवराबाजार सरपंच गणेश चौधरी,हिमांशु पानतावणे,शिवदास ऊईके,चंदु वंजारी,गुरुप्रसाद बोपटे,नरेंद्र मांढरे,मरकाम गुरुजी,रमेश ब्रम्हनोटे,बाल्या मासुरकर पुरवठा अधिकारी जाधव यांचे सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.