पुरग्रस्त भागाची आमदार बाळाभाऊ काशिवार यांनी नावेतून केली पाहणी…

लाखांदुर – नास्तिक लांडगे

गेल्या दोन दिवसापासुन मध्यप्रदेशातील बावनथडी प्रकल्पातील संजय सरोवराच्या सोडलेले पाण्यामुळे वैनगंगा नदीला भिषण स्वरूप प्राप्त झाले असून, भंडारा शहरासह जिल्ह्यातील वैनगंगा नदी काठावरील अनेक गावांमध्ये पुरपरीस्थिती निर्माण झाल्याने कित्येक घरांमध्ये पाणी घुसल्याने घरांची पडझड झाली आहे.

सोबतच धानाच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. लाखांदुर तालुक्यातील आवळी वासीयांना इंदोरा व सोनी येथे तर चिखलधोकडा वासीयांना विहीरगावला हलविण्यात आले आहे. तर सोनी, चप्राड, खैरी/पट, टेंभरी, डांभेविरली, गवराळा, मोहरणा, खैरणा, दोनाड, नांदेड, ईटान व विरली/खुर्द या गावांमध्ये पाणी घरांमध्ये पाणी घुसल्याने

आपत्तीग्रस्तांनी घराच्या छतावर आपला बस्तान हलविला आहे.

दरम्यान साकोली विधानसभा क्षेञाचे लाडके व लोकप्रिय माजी आमदार बाळाभाऊ (राजेश) काशिवार यांनी नावेच्या सहाय्याने आज सोमवारला (ता.३१) पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतीचे व घरांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विनोद ठाकरे, शहर अध्यक्ष कांचन गहाने, शेतकरी युवा नेते प्रियंक बोरकर, भारत मेहेंदळे, उपसरपंच गिरीष भागडकर, शैलेंद्र मोटघरे, गोपाल तरेकार, रिजवान पठान, ईस्तारी दिघोरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

भागळी येथे गणेश उत्सव गोपालकाला संपन्न.

भागडी येथे आज सोमवारला दोन ठिकाणी गणेश उत्सवाचे गोपालकाले मा.आ. बाळाभाऊ काशिवार यांच्या हस्ते संपन्न झाले असून, यावेळी बाळाभाऊ यांनी आपल्या भाषणातून जिल्ह्यात आलेले संकट लवकर दुर व्हावे. अशी श्री गणेश चरणी प्रार्थनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here