आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी कोपरा येथील पिडीत तरुणीची स्वामी रामानंद तिर्थ शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे एका तरुणीवर झालेल्या अन्यायाबद्दल कोपरा येथील ग्रामस्थांनी आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतल्यानंतर पिडीत तरुणीला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगुन आमदार पाटील साहेब यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय ,

अंबाजोगाई येथे जाऊन पिडीत मुलीची भेट घेऊन सांत्वन केले. तिला व तिच्या कुटूंबियांना संरक्षण व न्याय देणार असल्याचे सांगीतले. व येथील अधिष्ठाता डॉ. सुक्रे साहेब यांना पिडीत तरुणीना योग्य ते उपचार करून काळजी घेण्याचे सांगून तेथुनच तात्काळ लातूर जिल्हा पोलिस प्रमुख निखील पिंगळे साहेब यांना आमदार पाटील साहेब यांनी दोषींना तात्काळ अटक करून दोषींवर कठोर कारवाई करून शिक्षा देण्याच्या सुचना केल्या.

तालुक्यातील नागरिकांना आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी विनंती करून सांगीतले की, हा एक नाजूक प्रसंग आहे. कोणीही भावनिक न होता कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नये. जाती -जाती मध्ये सलोखा ठेवावा व तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असेही आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here