आ.अमोल मिटकरी यांची पर्यटन मंत्र्यांशी बैठक…

अकोट – कुशल भगत

कुटासा येथील ८९ हेक्‍टरवरील वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे होणारे नुकसान थांबावे व कुटासा येथे एक चांगला इको-टुरिझम प्रोजेक्ट सुरू होऊन नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा,

या उद्देशाने आज आमदार अमोल मिटकरी व राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांची मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होऊन कुटासा गावाचा चेहरामोहरा बदलेल व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यजीवापासून होणारे नुकसान थांबेल.

अशी आशा आता शेतकरी बांधव करत आहेत आणि आमदार अमोल मिटकरी यांनी आश्वासन दिले की लवकरच शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबेल व नव्या प्रोजेक्टला सुरुवात होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here