अकोला – कुशल भगत
अकोल्याच्या अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत पनोरी मधील पठार नदीवरील पुलामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पेशंट दवाखान्यात न्यायला सुद्धा दुसरा पर्याय नाही. लोकप्रतिनिधीना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केल्या जात आहे.
23 सप्टेंबरला एका प्रसूत महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी नदीला पूर आल्यामुळे कावसा प्रा. आरोग्य केंद्र कडे बैलगाडी ने न्यावे लागले. जर त्यावेळी महिलेचे काही झाले असते तर याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.
गावातील विध्यार्थ्यांना शिक्षणाकरीत बाहेर गावी जावे लागते. नदीला पूर आल्यावर विधार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गावातील नदीवरील पूल लवकरात लवकर व्हावा यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी आजपासून नदीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
जो पर्यंत पुलाची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय पनोरी गावकऱ्यांनी घेतला होता।.सकाळापासून नागरिक पठार नदीत आंदोलनाला बसले होते

प्रभाकर बुटे, गावकरी, पनोरी, ता. अकोट, जिल्हा अकोला
अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी भेट देऊन तात्काळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला नाबार्ड व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सकारात्मक असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, प्रशांत अढाऊ यांनी केले.लेखी आस्वासनांतर आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकाराने अन्नत्याग आंदोलन ची सांगता करण्यात आली.