भेटी दरम्यान अनेक कर्मचारी गैरहजर.
तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले कारवाईचे आदेश.
कुशल भगत
दिनांक 18/9/2020 रोजी कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्यान समिती ची बैठक आयोजीत केली होती ही बैठक सुरु असताना कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रातील परीचारक हा कोविड वार्डात मध्यपान केलेल्या अवस्थेत आढळुन आला होता त्याला तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समक्ष उभे करुन रुग्ण कल्यान समिती ने या परीचकावर पोलीस कारवाई करण्याची मागणी केली.
तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत जर का असे प्रकार घडत असतील तर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वर पण कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी रुग्ण कल्याण समिती ने लावुन धरली होती कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रात जो हा प्रकार उघडकीस आला होता,
तोच प्रकार आम्ही आमच्या महाव्हाईस न्युज च्या माध्यमातुन जनते समोर प्रकाशीत केला व यांचीच गंभीर दखल घेऊन आज विधान परिषद चे आमदार अमोल मिटकरी यांनी कावसा प्राथमीक आरोग्य केंद्राला भेट दिली व काल घडलेल्या प्रकरनाची चौकशी करुन दोशीवर लवकर कारवाई करावी.असे निर्देश वरीष्ठ आरोग्य अधिकारी यांना दिले..तसेच आज आरोग्य केंद्राला दिलेल्या भेटीमध्ये अनेक कर्मचारी गैरहजर आढळले याबाबत त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.