वनाधिकाऱ्यांनीच गाडीत भरला तोडलेला लाकूडफाटा !…पदाचा आणि शासकीय वाहनाचा केला दुरुपयोग !!

भंडारा : अभयारण्यातील जंगलातील सागाचे वृक्ष कटाई करून ते शासकीय वाहनातून ‘चिरान’ करण्यासाठी नेले. यात वनाधिकारी यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गौरवापर केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. वनाधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार वनमजुरांच्या मदतीने केला आहे.


वन्यप्राण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोका वन्यजीव अभयारण्यातील कक्ष क्रमांक १६८ मधील कसई गेटजवळ साग वृक्षाची कटाई करण्यात आली. ही कटाई जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली. सदर साग झाडाची कटाई करण्याचे तोंडी आदेश तत्कालीन क्षेत्र सहाय्यक ओ. एस. बनोटे आणि वनरक्षक एम. एल. हाके यांनी वन मजुरांना दिले. सदर वनमजूर हे चंद्रपूर येथील कार्यालयासमोरील गेटवर कर्तव्य बजावतात, हे विशेष.

या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या तोंडी आदेशाचे पालन मजुरांनी करून सदर सागाचे झाड तोडले. याकरिता कटाईसाठी लागणारी आरी ही गडकरी नामक वन मजुराने आणली. त्यानंतर पटले, गडकरी, राऊत आणि पंधरे चार मजुरांनी मिळून दिवसा सदर साग झाडाची कटाई केली. झाड तोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोबडे, गडकरी, पटले आणि राऊत, या वनमजुरांच्या मदतीने या विशालकाय झाडाचे तुकडे केले.

झाडाची तोड केल्यानंतर सदर लाकूडफाटा अभयारण्याच्या अधिकाऱ्याच्या शासकीय वाहनात (४२३) भरण्यात आले. हे वाहन रस्त्यालगत असलेल्या नालीजवळ उभे करण्यात आले होते. हा लाकूडफाटा वनपरिक्षेत्राधिकारी सचिन जाधव, क्षेत्र सहाय्यक ओ.एस. बनोटे, वनरक्षक एम. एल. हाके यांनी स्वतः चालक रामटेके यांच्यासह वनमजुरांच्या मदतीने शासकीय गाडीत भरला, हे विशेष. हा सर्व प्रकार सकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला.

यावेळी रस्त्यावरील वर्दळ सुरू झाली होती. ज्यांच्यावर वनाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, अशा वन अधिकाऱ्यांनीच त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करीत साग झाडाची तोड केल्याने ‘कुंपणच शेत खात’ असल्याची प्रचिती यावरून येते. लाकूडफाटा शासकीय वाहनात (४२३) भरल्यानंतर सदर वाहन चंद्रपूर येथील कार्यालयाकडे नेले. त्यानंतर त्याचे सोयीनुसार ‘चिरान’ करून विल्हेवाट लावली.

प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी केला संपर्क :-
सागवृक्षाची तोड व शासकीय वाहनातून वाहतूक केली. या गंभीर प्रकरणात वनपरिक्षेत्राधिकारी सचिन जाधव, क्षेत्र सहायक ओ. एस. बनोटे आणि वनरक्षक मोहन हाके यांचे नाव समोर आली. त्यामुळे तिघांच्याही भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात क्षेत्र सहायक बनोटे यांचा भ्रमणध्वनी बंद होता. तर, वनरक्षक मोहन हाके यांनी प्रतिसाद दिला नाही. वनपरिक्षेत्राधिकारी सचिन जाधव यांच्याशी संपर्क झाला, त्यांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली.


मी सध्या रजेवर आहे. याबाबत ज्यांच्याकडे सध्या प्रभार आहे अशा सचिन नरड यांना विचारा. पुरावा किंवा तक्रार असल्यास तर बोला. यावर त्यांना पुरावा आहे. असे सांगितले असता, त्यांनी मी प्रतिक्रिया देत नाही तुम्हाला योग्य वाटेल ते करा, अशी प्रतिक्रिया कोका वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी (सध्या रजेवर असलेले मात्र, प्रकरण त्यांच्या रेग्युलर कर्तव्यावर असताना झालेले) सचिन जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here