आलापल्लीत गाळे वाटपात ग़ैरव्यवहार….चौकशीची मागणी…आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निवेदन दिले

अहेरी:- आलापल्ली ग्राम पंचायतीच्या मालकीची गाळ्याची परस्पर लीलाव करून ग़ैरव्यवहार करण्यात आल्याने प्रकरणाची कसून चौकशी करून योग्य न्याय निर्वाळा व दोषीनवर कार्यवाही करण्याची तीव्र मागणी करून नागरिकांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निवेदन दिले आहे.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष इरफान शेख यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आलापल्ली ग्राम पंचायत हद्दितील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जल शुद्धिकरण यंत्र बसविन्यात आले,

पण काही दिवसातच जलशुद्धिकरण यंत्र बंद पडले. जल शुद्धि केंद्राच्या खोलीमध्ये गाळा होते सदर गाळा कोणालाही विश्चासात न घेता परस्पर लीलाव करून टाकले.

या आधी सुद्धातक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रकरणाची कसून सखोल चौकशी करून आलापल्ली वासियांना न्याय मिळवून देण्याची मागणी चक्क ग्राम पंचायत सदस्यांनी व नागरिकांनी निवेदनातून केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here