समाज प्रबोधनातून एड्सविषयीचे गैरसमज दूर:सपोनि प्रविण पाटील…

जागतिक एड्स सप्ताहानिमित्त रिक्षा चालकाचे प्रबोधन…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

ट्रक चालक, रिक्षा चालक,हॉटेल कामगार,कंपनी कामगार यासह इतर स्थलांतरित अति जोखमीच्या  कामगारांचे  समुपदेशन होत आहे. एचआयव्ही/एड्स ,गुप्तरोग, क्षयरोग या विषयी शास्त्रीय माहिती मिळत आहे. गोकुळ शिरगावच्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स विषयी समाज प्रबोधनाचे उपक्रम दिशादर्शक आहेत.असे प्रतिपादन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि प्रविण पाटील यांनी केले.

जागतिक एड्स सप्ताहानिमित्त युवा ग्रामीण विकास संस्था,श्री.चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ ,स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प गोकुळ शिरगाव व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक सीपीआर आयोजित रिक्षा चालक व ट्रक चालक यांच्या करिता आयोजित एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

विषमता संपवा,एड्स संपवा,महामारी संपवा या घोष्य वाक्यातून एड्स विषयी असलेला  कलंक आणि भेदभाव नष्ट होत आहे. पथनाट्य,चित्रफीत,माहिती पत्रके ,चर्चा सत्र मधून लोक जागृत होण्यासाठी समाज प्रबोधन हे माध्यम सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून निर्माण झाल्याने एचआयव्ही/गुप्तरोग, क्षयरोगला आळा बसत आहे.

या कार्यक्रमासाठी  सपोनि रमेश गायकवाड,प्रल्हाद कांबळे, कुणाल वाईगडे,अक्षय साळोखे,अक्षय सांगलीकर,प्रवीण पोवार,साताप्पा बोगार्डे, शिवप्रसाद पाटील, दीपाली सातपुते यांच्यासह रिक्षा चालक,आदी उपस्थितीत होते.मोहन सातपुते यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

फोटो ओळ: जागतिक एड्स सप्ताहानिमित्त गोकुळ शिरगाव येथे रिक्षा चालक यांच्यासाठी आयोजित कार्यक्रम प्रसंगी सपोनि प्रवीण पाटील,सपोनि रमेश गायकवाड,प्रकल्प अधिकारी मोहन सातपुते, साताप्पा बोगार्डे, आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here