मिरजमध्ये वाहतुक शाखा पोलिसांची नाकाबंदी, कर्नाटकमधून येणाऱ्या गाड्यांवर तसेच मास्क न घातलेल्यांवर दंडात्मक कारवाई…

फोटो- सांकेतिक

सांगली – ज्योती मोरे

मिरज मध्ये वाहतुक शाखेमार्फत महात्मा फुले चौकात, नाकाबंदी करण्यात येऊन.त्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातील चार चाकी वाहनांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली. कागदपत्रे नसलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

तसेच जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार जे नागरिक आणि वाहन धारक कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळत नाहीत.त्यांच्यावर सुध्दा दंडात्मक कारवाई करण्यात आली..राज्यात कोरोनाच्या व ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर सदर कारवाई करत असल्याची माहिती मिरज शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here