मिरज मालगाव रोड अमननगर येथे रस्त्यावर कचरा, हाॅस्पिटलचा बायोमेट्रिक ही कचरा रस्त्यावर, सभापती चे वार्डाकडेच होतंय का दुर्लक्ष नागरिकांचा सवाल…

सांगली – ज्योती मोरे

मिरज-मालगाव रोड येथे अमननगर येथे रस्त्यावर कचरा पडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.मालगाव सुभाषनगर हा रोड रुंदी ने लहान आहे, रस्त्याकडेलाच कचरा कंटेनर आहे. कचऱ्यामध्ये कंटेनर आहे की कंटेनरमध्ये कचरा हेच समजून येत नाही.

कंटेनर असून सुद्धा कंटेनर मध्ये कचरा पडत नाही तर कंटेनर च्या बाहेर आणि आजुबाजूला पडलेला असतो.हाॅस्पिटल चा बायोमेट्रिक कचरा सुध्दा येथे पडलेला असतो.परत अजुन कोंबडीची पक्के,चिकन चे मांस वगैरे येथे पडलेले असतात.यामुळे येथे भटक्या कुत्र्यांचा आणि गाढवाचा वावर वाढला आहे.या चिकन चे मांस खाण्यासाठी भटकी कुत्री येत असतात,आणि भांडत असतात भांडत भांडत रस्त्यावर येऊन दुचाकी च्या आडवे येत असतात.यामुळे येथे ॲक्सीडेन्ट चे प्रमाण वाढले आहे.

येथे दोन नामांकित हाॅस्पिटल आहेत, त्याच्या बायोमेट्रिक कचरा सुध्दा येथे पडत असतो.या कचरामुळे येथील नागरिकांना आणि लहान मुलांना इन्फेक्शन होत आहे.या बायोमेट्रिक कचरामुळे येथे हवेमध्ये त्यांचे विषाणू पसरुन येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

त्या दोन हाॅस्पिटल वर कारवाई करावी असे नागरिकांनी सांगितले आहे.आणि लवकरात लवकर या वर तोडगा काढावा आणि हा कंटेनर येथून हलवावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.महानगरपालिकेने या कचरा टाकण्यावर जर प्रतिबंध केला नाही तर हा कचरा महानगरपालिकेच्या आत मध्ये आणून टाकू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here