सिटीस्कॅन मशिन देतो म्हणून मिरजेत डॉक्टरची १२ लाख रुपयांची फसवणूक…

सांगली – ज्योती मोरे

सिटीस्कॅन मशिनचा पार्ट देतो असे सांगून मिरज येथील डॉक्टरची बारा लाख रुपयांची फसवणूक,याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी संतोष चंदू कुलगोड वय 47, व्यवसाय डॉक्टर, राहणार आदीलक्ष्मी अपार्टमेंट, गुलाबराव कॉलेज जवळ, मिरज यांचे आदित्य डायग्नोस्टिक सेंटर हे, गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेज मिरज जवळ असून , त्यांना आरोपी अली मोहम्मद जाफर,

राहणार नागपूर , याने फिर्यादी डॉक्टर संतोष कुलगोड यांना डायग्नोस्टिक सेंटर मध्ये असलेल्या एमआरआय सीटी स्कफन मशीनचे ट्यूब देतो असे सांगून त्यांचेकडून ऑनलाईन पद्धतीने आरटीजीएसने बारा लाख रुपये इतकी रक्कम घेऊन त्यांना सिटीस्कॅन मशीनचे ट्यूब दिली नाही व त्यांची बारा लाख रुपयांची फसवणूक केली आहे,

याबाबत डॉक्टर संतोष कुलगोड यांनी आरोपी आलिम मोहम्मद जाफर यांने फसवणूक केल्याची फिर्याद , महात्मा गांधी चौक , मिरज पोलिस ठाण्यात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here