मिरजेत बेकायदेशीर गॅस रिफलिंग अड्डयावर मिरज शहर पोलिसांचा छापा  तेरा गॅस सिलेंडर टाक्या सह रिफलिंग साहित्य जप्त, एकाला अटक…

सांगली – ज्योती मोरे.

शनिवार पेठ बारा इमाम दर्गा येथील बेकायदेशीर गॅस सिलेंडर साठा करून रिक्षा व वडाप वाहनात गॅस  भरण्याचे काम करत असल्याची माहिती मिरज शहर पोलीस ठाण्याला मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व विष्णू काळे ,पोलीस नाईक बिराजदार संदीप नाईक, सचिन सनदी, नागेश मासाळ, दीपक परीट,

अमित कोळी यानी छापा मारून आरोपी मारुफ फारूक बरगिर वय 39 राहणार गुरुवार पेठे याला अटक केली आहे  भडविस 285 सह कायदा जीवनावश्यक कायदा कलम तीन सात नुसार गुन्हा दाखल करून 7 भारत कंपनीच्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर 12 हजार पाचशे रुपये दोन व्यावसायिक वापराच्या भारत कंपनीच्या गॅस सिलेंडर टाक्या 5 हजार रुपये किंमत  चार छोट्या टाक्या दोन हजार रुपये,

एक इलेक्ट्रॉनिक मोटर गॅस भरण्याची रेग्युलेटर चार हजार रुपये एक इलेक्ट्रॉनिक काटा 3 हजार रुपये  असा 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे  आरोपी मारुफ बारगिर याला दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here