धानरोवणीसाठी मजूर घेऊन जाणारी मिनिमेटाडोर झाला पलटी…१९ महिला मजूर जखमी तर ८ गंभीर…

गडचिरोली:
धान रोवणीसाठी महिला मजुरांना घेऊन जाणारा मिनी मेटाडोर पालटून झालेल्या अपघातात १९ महिला मजूर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास कुरखेडा देसाईगज मार्गावर गेवर्धा गावानजीक घडली यामध्ये आठ मजूर गंभीर जखमी असल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविण्यात आले आहे


जखमीमध्ये शामिना मलगाम ३८,रोहिणी धुर्वे २८,वैशाली धुर्वे ३२,शीतल पुराम २१,मीनाक्षी कुलमेथे३१,संगीताधुर्वे ४३,कमल करपते५३,उत्तरा पंधरे५०,सायत्रा नेवारे५५,प्रियंका मलगाम ३७,पुजा धुर्वे२१,जागृती मलगाम १८,कल्पना पुराम३७,प्रतिभा नेवारे ३०,निखिता मलगाम३५, अर्चना मलगाम३२,प्रतिभा करपते २८,विमल करपते ४०,भारती मलगाम४१ यांचा समावेश आहे


सर्व मजूर देसाईगज तालुक्यातील डोगरमेंढा येथिल रहिवासी आहेत सर्व मजूर डोंगरमेंढा येथून एका मिनि मेटाडोरने कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथे धान रोवणीच्या कामासाठी जात होते दरम्यान गेवर्धा गावाजवळ वाहनचालकाचे संतुलन बिघडल्याने वाहन पालटल्याने हा अपघात झालाअपघाताचे वृत्त समजताच भाजपचे तालुकाध्यक्ष नाजुक पाटील पुराम,माजी तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेने विचारपूस केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here