बड्या बड्या बाता आणि धोरण खातंय लाथा अशी मंत्री वडेट्टीवार यांची गत – आमदार गोपिचंद पडळकर…

सांगली – ज्योती मोरे

महा ज्योति संस्थेनं एमपीएससी आणि यूपीएससी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीत निर्वाहभत्ता आणि विद्यावेतन देण्यास नकार दिल्यानं, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधलाय. “बड्या बड्या बाता आणि धोरण खातंय लाथा” अशी वडेट्टीवार यांची गत झाली असून, ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याचं दाखवायचं आणि त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचं हे धोरण प्रस्थापितांच्या सरकारनं अवलंबलं असल्याचंही आमदार पडळकर यांनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here