कर्नाटकचे फलोत्पादन मंत्री आर शंकर यांची लठ्ठे ऍग्रो फार्मला अचानक भेट…

राहुल मेस्त्री

कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील हंचिनाळ ता.निपाणी येथील फूल उत्पादनात अग्रेसर असलेल्या ओम फ्लॉवर्स, लठ्ठे हायटेक ऍग्रो फॉर्मला कर्नाटकचे फलोत्पादन मंत्री आर शंकर यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या पत्नीसह अचानक भेट दिली. त्यांचे स्वागत फाँर्मचे मालक अजित लठ्ठे व माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी त्यांनी आपल्या भेटीचा उद्देश स्पष्ट करून फलोत्पादनात लावणीपासून ते विक्री पर्यंतच्या समस्या जाणून घेतल्या सुमारे तीन ते चार तास त्याने ओम फ्लॉवरचे अजित लठ्ठे यांच्याशी जरबेरा व लीप सोफीला या फुलांच्या उत्पादनाबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांना कोरोनाच्या काळामध्ये कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याबाबतही त्यांनी सखोल चर्चा करून फूल उत्पादनात कर्नाटक राज्य अग्रेसर होण्याच्या दृष्टीने प्रेरणा म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी प्रोत्साहन दिले.

यावेळी बोलताना मंत्री आर शंकर म्हणाले कर्नाटक शासनाच्या वतिने शेतीसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ सीमाभागातील शेतकऱ्यांनी घ्यावा. फुले – फळे यासाठी कर्नाटकात मोठ्या बाजारपेठा उपलब्ध आहेत. कोणतीही समस्या निर्माण होत असल्यास शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही मंत्री आर शंकर यांनी केले.

त्यांच्यासमवेत बेळगावचे डेपोटी डायरेक्टर ऑफ हाँर्टिकल्चर रवींद्र हाकाटे, हिडकल येथील शेतकरी अशोक बोगापुर, राजू बोराजी, मल्लांना पलेर ,तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील,ग्रा.पं.सदस्य सचिन खोत, चिकोडी सीनियर असिस्टंट ऑफ हाँर्टिकल्चर एम एच सिंधीहोळ, असिस्टंट हॉर्टिकल्चर चिकोडी अण्णासो कांबळे, मुरलीधर कोळेकर, यश लठ्ठे, ओम लठ्ठे यांच्यासह ओम फ्लॉवर्ससचे सुपरवायझर उपस्थित होते. शेवटी मॅनेजर नितीन खोत यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here