राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आदेश “डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या नवी मुबईतील अपेजय शाळेची चौकशी होणार”

“शाळा प्राचार्य व संस्था चालक यांच्यावर देणगी प्रतिबंध कायद्या नुसार गुन्हा दाखल करा” शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांचे आदेश…

नेरूळ येथील Apeejay स्कूल प्राचार्य व संस्था चालक यांनी पालकाकडून शाळा प्रवेशासाठी १,२२,२०१रु. डीडी व ६४५७ रु. ऑनलाईन घेतल्याची तक्रार पालकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कडे केली, या तक्रारी नुसार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळेची चौकशी करून डोनेशन प्रतिबंध कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

The Maharashtra Educational Institutions(Prohibition of Capitation Fee) Act,1987 अंतर्गत अनुदानित किवा विनानुदानित शाळेत शाळा प्रवेशासाठी डोनेशन घेणे फौजदारी गुन्हा आहे. पालक अजय तापकीर यांनी त्याची मुलगी कथा तापकीर याच्या शाळा प्रवेश वेळी दिलेली डीडी व ऑनलाईन पेमेंट याची झेरॉक्स पुरावा म्हणून जोडला आहे.

Apeejay स्कूल नेरूळ मधील प्राचार्य व संस्था चालक यांच्यावर The Maharashtra Educational Institutions(Prohibition of Capitation Fee) Act,1987 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून पालकांचे पैसे परत देण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष adv. मनोज टेकाडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here