राज्यमंत्री बच्चू कडूंची कबड्डीच्या मैदानात एंट्री…

न्युज डेस्क – राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असल्याचे आपण पाहतो.आता तर चक्क राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कबड्डीच्या मैदानात एंट्री केल्याचं समोर आलं आहे.अमरावतीच्या चांदुर बाजार मध्ये गो सी टोम्पे महाविद्यालयात तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उटघाटन केल्यानंतर बच्चू कडू यांनी स्वतःहा मैदान उतरून कबड्डी खेळाचा आनंद घेतला.

राज्यमंत्री बच्चू कडू हे नेहमी चर्चेत असतात.गावखेड्यात चालतं असलेल्या खेळाशी बच्चू कडू यांची आजही नाळ कायम आहे.कधी कुस्ती,कधी कबड्डी या खेळातून राज्यमंत्री बच्चू कडू हे मातीतील खेळाच मैदान गाजवत असतात.

आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांची कबडी या खेळाची टीम होती.त्यामुळे त्यांना असलेला कबड्डी खेळाचा छंद ते आजही जपतात.अशाच प्रकारे चांदुर बाजार मधील एका महाविद्यालयात कबड्डी सामन्याच्या उटघाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले बच्चू कडू चक्क खेळाडूच्या भूमिकेत दिसल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here