मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे – नितीन चौगुले…

मंत्री मलिक यांचा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून निषेध…

सांगली – ज्योती मोरे

कर्तव्यदक्ष एन.सी.बी. अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील लोकांवर हेतुपुरस्सर खोटेनाटे आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या मंत्रीमंडळातून काढून टाकावं अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केलीय. ड्रग्ज माफियांना पाठीशी घालणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये निदर्शनं करण्यात आली त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यामुंबईतील क्रुझवर चालू असलेल्या पार्टी वर धाड टाकून एन.सी.बी.अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान चा मुलगा आर्यन खानसह अनेकांना अटक केली होती. त्यामुळे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ती वैयक्तिक स्तरावर जाऊन तसंच, त्यांच्या कुटुंबावरती नको ते खोटे आरोप केलेयत. नवाब मलिक हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अल्पसंख्यांक मंत्री आहेत.

वास्तविकरित्या नवाब मालिकांच्या खात्याचा काही संबंध नसताना त्यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळं त्यांच्यावर सरकारी तपास कामात हस्तक्षेप केल्याबद्दल 353 आयपीसी कलम 186, 500, आणि 506 या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणीही नितीन चौगुले यांनी यावेळी केलीय. यावेळी समीर वानखेडे यांच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव करुन,त्याचं अभिनंदन करण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here