सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? स्पर्धा परीक्षांच्या लाखो विद्यार्थ्यांना संधी कधी मिळणार..?

सरकार विद्यार्थ्यांकडे लक्ष कधी देणार?
कोरोणाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे आता तरी सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करावा…

न्युज डेस्क – राज्यातील वाढती बेरोजगारी हा सध्याचा ऐरणीच्या प्रश्न आहे. गेली दोन वर्ष कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य सरकार तसेच प्रशासनाने कोरोना चे कारण देत एक परीक्षा घेतलेली नाही. अनेक तरुण बेरोजगार इस त्रस्त होऊन सध्या आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. २०१९ मध्ये विविध विभागाचे पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती त्याचे फॉर्म ही 2019 मध्ये भरून घेतले होते.

पण जवळपास दीड ते दोन वर्ष झाले असून देखील या पदाची परीक्षा झालेली नाही. कोरोणाचा प्रादुर्भाव तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना भोगावा लागत असलेला त्रास हा सहन न होणार आहे.कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे गेली दोन वर्ष कुठल्याही परीक्षा घेता आल्या नाही हे मान्य आहे पण आता अमरावती जिल्ह्यात तसेच राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव आटोक्‍यात येत आहे.

सध्या राज्यात कोरोणा ची दुसरी लाट येऊन गेली आता तिसरी लाट केव्हा येणार काही सांगता येत नाही मग असे असताना विद्यार्थ्यांना किती दिवस टांगणीवर ठेवाल? परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडली जावी यासाठी राज्य सरकार प्रशासन तसेच आयोगाकडून योग्य तयारी करण्यात यावी व तसे नियोजन करावे. परीक्षा पुढे ढकलून ढकलून किती ढकलण्यात येणार आणि त्यामुळे उमेदवारांचे वय वाढत गेले व ते अपात्र ठरले तर मग उमेदवाराने काय करावे.

यासोबत उमेदवाराचे मानसिक ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक ताण ,सामाजिक जबाबदाऱ्या अशा विविध कारणांना उमेदवार समोर जात आहेत. विविध परीक्षा कोरोणा च्या प्रादुर्भावामुळे समोर ढकलण्यात आल्या होत्या मग आता कोरोणाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे तर मग परीक्षांचे नियोजन सरकार व प्रशासनाने योग्य रित्या लवकर करावे.

शासकीय सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज अमरावती शहरातील हजारो विद्यार्थी तसेच राज्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. कोरोणाच्या महामारी मुळे कित्येक युवकांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारीचे प्रमाण वाढले ग्रामीण सारख्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असे असताना विद्यार्थ्यांना किती दिवस टांगणीवर ठेवणार सरकार?

राज्य शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये अखेरच्या रिक्त पदांची माहिती दिली होती त्यामध्ये दोन लाखाहून अधिक शासकीय पदे रिक्त होत्या गेली दिड वर्षात आणखी काही पदे रिक्त झालीच असतील म्हणजे ती आता जवळपास तीन लाख पदे रिक्त असेल. इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची आकडेवारी असताना प्रशासनावर ताण येत नसेल का याचा तरी विचार सरकार व प्रशासनाने करावा.

कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे ठराविक काळात पुरती असल्याने ती पदेही रिक्त झाली असेल. आज कोरोना सारख्या महामारीमुळे आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत आहे असे असताना आरोग्य विभागाच्या किती तरी पदर रिक्त असताना आपण त्या पदाची पदभरती का घेत नाही आहात तसेच पोलीस विभागातील रिक्त पदांची पदभरती केव्हा घ्याल.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य विभाग पोलिस विभाग पूर्णतः हा कोलमडून गेली आहे व त्यांच्यावर खूप प्रमाणात ताण वाढलेला आहे असे असताना आपण त्या पदाची पदभरती करून त्यांच्यावरील ताण नाहीसे करावे.महाभरतिच्या ३४ लाख अर्जदारांचा स्वप्नभंग झाला का कारण वर्ग-3 चारच्या कर्मचाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा आदेश तुम्ही काढला होता मग विद्यार्थ्यांची जवळपास १३० कोटी रक्कम वाया गेली का?

प्रशासन व सरकार यांनी राज्यात होणाऱ्या ७० ते ७२ हजार पदांसाठी मेगा भरती करिता खुल्या वर्गासाठी ४०० मागासवर्गीयांसाठी २०० रुपये परीक्षा शुल्क आकारले होते. ३४ जिल्ह्यामधील विविध पदांसाठी ही भरती असल्याने एका विद्यार्थ्याने अनेक पदांसाठी ३ ते ४ हजार रुपये खर्चून अर्ज केले होते. मग त्यात तुम्ही कंत्राटी पद्धतीने भरती चा आदेश दिला मग विद्यार्थ्यांचे पैसे वाया गेले का.

सरळ सेवा व पदोन्नतीतील रिक्त पदे

गृह विभाग : २४८४८
गृहनिर्माण : २८१
जलसंपदा विभाग : २०८७३
उच्च व तंत्रशिक्षण : ३७६२
कृषी विभाग : १४३६४
महसूल विभाग : ७७४७
वनविभाग : २८६४
मदत व पुनर्वसन : ७२२
वैद्यकीय शिक्षण : ६४९०
वित्त विभाग : ५५६७
आदिवासी विकास : ७३९१
शालेय शिक्षण : ३२२१
सहकार विभाग : २५६
सार्वजनिक बांधकाम : २८३५
वस्त्र उद्योग : १६७
समाज कल्याण : २८५६
उद्योग विभाग : २१११
अन्न व पुरवठा विभाग : १२९५
पाणीपुरवठा : २७३६
महिला व बालकल्याण : ७२८
विधी व न्याय : १४४५
नगर विकास : २९७६
नियोजन विभाग : ५५२
कौशल्य विकास : ५०५५
ग्राम विकास : २५६
पर्यटन विभाग : ३०१
सामान्य प्रशासन : २१००
पर्यावरण : २
मराठी भाषा विभाग : ४४

अश्या जवळपास २ ते ३ लाख रिक्त पदे सरकार केव्हा भरणार.राज्य सरकारने रिक्त पदे भरावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती शहर सातत्याने पाठपुरावा करत आहे विशेषतः आरोग्य विभागवार प्रचंड ताण येत असताना सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जात नाही. कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागावर प्रचंड ताण आलेला आहे व ती पूर्णतः ढासळली असतानाही सरकार आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया का करत नाही आहे.

सरकारने विद्यार्थ्यांचा अंत बघू नये आता लवकरात लवकर विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती शहर विद्यार्थ्यांकरिता मोठे आंदोलन उभे करेल यास जबाबदार स्वतः सरकार राहणार.

लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे विद्यार्थ्यांसोबत ZOOM MEET द्वारे संवाद साधतील विद्यार्थ्यांचे समस्या समजून सरकारला धारेवर कसे धरायचे यांचे नियोजन करतील. विद्यार्थ्यांनी आता सरकारला त्यांची जागा दाखवन्या करीता जन आंदोलन उभे करावे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती शहर आपल्या सोबत राहणार.सरकारने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे बंद करावे.

हर्षल ठाकरे
शहराध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती शहर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here