एम.आय.डी.सी. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत हरीत न्यायालय पुणे यांचा दणका: प्रदुषण करणाऱ्या दोन कारखान्यास प्रत्येकी रू. १.५० कोटीचा दंडाची नोटीस…

सांगली – ज्योती मोरे

कुपवाड एम.आय.डी.सी. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत सांगलीजिल्हा संघर्ष समितीचे कार्यकर्ते श्री. तौसिफ बागणीकर यांनी राष्ट्रीय हरीत न्यायालय पुणे येथे याचिकादाखल केली होती. श्री. बालाजी अॅनोडायझींग प्लॉट नं. एल ५७ आणि निक्स पॉलिमर्स प्लॉट नं. एल ५७ या कारखान्यांमुळे पर्यावरणाची प्रचंड प्रमाणात हानी होत असल्याचे निदर्शनास आले होते.

त्याबाबत महाराष्ट्रप्रदुषण नियंत्रण मंडळ सांगली आणि कोल्हापूर विभागिय कार्यालय यांचेकडे तक्रार करण्यात आली होती. त्याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाने योग्य ती कारवाई केली नाही म्हणून, अॅड. ॐकार वांगीकर यांचे मार्फत राष्ट्रीय हरीत न्यायालय पुणे येथे याचिका सादर केली होती. त्याची सुनावणी आज होऊन श्री. बालाजी
अॅनोडायझींग प्लॉट नं. एल ५७ यांना रु. १.५४ कोटी आणि निक्स पॉलिमर्स प्लॉट नं. एल ५७ यांना रु. १.५१ कोटी दंड पर्यावरणाची हाणी केल्याबद्दल करण्यात आला आहे.

याबाबतची नोटीस देण्यात सदर कारखान्यांना देण्यात आली आहे.सदरचे कारखाने सुरु करण्यापुर्वी कोणत्याही आवश्यक परवानग्या न घेता गेली अनेक वर्षे हे कारखाने चालू आहेत. त्यामुळे शासनाचा कोटयावधी रुपयांचा महसुल बुडाला आहे. या कारखान्यांकडे कायद्यान्वये आवश्यक असणारा उद्योजक परवाना, प्रदुषण विभागाचा ना-हकरत दाखला, कामगार कल्याण मंडळाची नोंदणी, महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाकडील नोंदणी इ.इ. कोणतिही कागदपत्रके नाहीत.

ही बाब माहिती अधिकारात संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मिळविल्यानंतर तशी तक्रार दाखल करण्यात आली होती. विषेश बाब म्हणजे महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ यांचेकडे सदरचा भुखंड ज्यांचे नावांवर आहे ती व्यक्ती या जागेवर कोणताही व्यवसाय करत नाही, त्यांनी सदरचा प्लॉट महामंडळाची पुर्व परवानगी न घेता त्रयस्थ व्यक्तीस भाडयाने दिला आहे. तो भाडेकरारही नोंदणीकृत नसल्याने महाराष्ट्र शासनाची लाखो रुपयांची स्टॅंपडयुटीही चुकविण्यात आली आहे.

यापुढे प्रदुषण करणाऱ्या उद्योग आणि शासनाचा महसुल बुडविणाऱ्यांच्यावर जरब बसावी या करीता संघर्ष समिती कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा संघर्ष समितीच्या तानाजी रुईकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी रवींद्र चव्हाण, गोरख वनखडे, आसिफ मुजावर, राजू आवळे, संतोष कदम, सुनील गीड्डे, आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here