एमजी अॅस्टरची बुकिंग झाली फुल…

एमजी मोटार इंडियाने आपल्या अॅस्टर कारसाठी आजपासून बुकिंग्ज सुरू केली. अवघ्या काही मिनिटांतच सर्व कारची विक्री झाली. कारची डिलिव्हरी १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. यावर्षी ५ हजार कारची डिलिव्हरी करण्याचे एमजी मोटार इंडियाचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना २०२२ या वर्षासाठी अॅस्टरची बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच अधिकृत एमजी शोरूममध्ये जाऊनही करता येईल. एमजी अॅस्टर ही भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट आणि आपल्या सेग्मेंटमधली पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-२) टेक्नॉलॉजी असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही असून ९.७८ रु. च्या खास प्रारंभिक किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

एमजी मोटार इंडियाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव छाबा म्हणाले की, “एमजी अॅस्टर ही प्रीमियम मिड श्रेणीतील एसयूव्ही आहे. मनमोहक एक्स्टेरिअर्स, आलीशान इंटिरिअर्स आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या तंत्रज्ञानाचा मिलाफ या कारमध्ये साधण्यात आला आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या तडाखेबंद प्रतिसादामुळे आम्ही अत्यंत हरखून गेलो आहोत. तथापि, जगभरातील वाहन उद्योग चिपच्या तुटवड्याला सामोरा जात आहे. यामुळे आम्ही यंदा मोजक्या संख्येनेच कारचा पुरवठा करू शकू. येत्या वर्षातील पहिल्या तिमाहीपासून पुरवठा सुरळीत होण्याची आम्हाला आशा आहे.”

अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर आणि सर्वोत्कृष्ट डिझाइन तसेच समकालीन शैलीच्या जोरावर अॅस्टर ग्राहकांना आपलेसे करते. हळुवार स्पर्शाची अनुभूती देणारे कारचे इंटिरिअर्स हे सर्वोत्तम वस्तूंचा वापर करून सुबकपणे तयार करण्यात आले आहेत. ग्राहकांना स्टाइल, सुपर, स्मार्ट आणि सर्वोत्कृष्ट शार्प व्हेरियंट्समधून आपल्या पसंतीच्या प्रकाराची निवड करता येईल. ८० पेक्षा जास्त कार कनेक्ट वैशिष्ट्यांनी सुसज्ज या एसयूव्हीची इंजिन आणि ट्रान्समिशन पर्यायांच्या आधारे ९ व्हेरियंट्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. ग्राहकांना अत्याधुनिक ड्रायव्हिंग परफॉर्मन्ससोबत एमजीच्या आय स्मार्ट हबच्या विविध सबस्क्रिप्शनचाही अनुभव घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here