महात्मा फुले विज्ञान व कला महाविद्यालायत कर्मचाऱ्या चा मानसीक छळ; विना प्राचार्य महाविद्यालय चालविल्याचा आरोप…

पातूर – निशांत गवई

पातूर शहरातील महात्मा फुले विज्ञान व कला महाविद्यालय्चाय संस्थाचालक पिता पुत्रा कडुन एका प्राध्यापीकेचा विनयभंग झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे या महाविद्यालयाच्या संस्थाचालका कडुन कर्मचाऱ्या ना वेठीस धरण्याचे काम अनेक दिवसा पासुन सुरु होते.

कर्मचाऱ्या ना मानसिक छळ सुध्दा या संस्था चालक पिता पुत्रानी चालविला असल्याने अनेक कर्मचारी संस्था चालकाच्या कारभारा मुळे मेटाकुटीस आले होते अखेर एका प्राध्यापीकेचा विनयभंग करण्या प्रर्यत मजल मारणाऱ्या या महाविद्यालयाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी  करण्याची मागणी होत आहे.

पातूर येथील महात्मा फुले विज्ञान व कला महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष सुभाष उर्फ शंकर बोचरे व त्याचा पुत्र हरीश बोचरे यांनी या महाविद्यालयाच्या एका प्राध्यापीकेचा विनयभंग केल्याने त्याच्या विरोधात पातूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्या ना अनेक दिवसा पासुन आर्थिक अडचणी मध्ये पकडण्याचे काम संस्था चालका करुन होत असल्याचा आरोप आहे.  

या महाविद्यालयाच्या शिक्षक कर्मचाऱ्याना गेल्या २५ तर शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ५५ महिने पासनु वेतन देण्यात आले नाही. या मुळे या महाविद्यलाय्चाय कर्मचाऱ्या ची आर्थिक स्थीती अंत्यत बिकट झाली आहे.

या महाविद्यलयाच्या कर्मचाऱ्या नि २७ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे धरणे आदोलन सुध्दा केले होते परंतू त्यावर तोडगा काढण्या ऐवजी संस्था चालक सुभाष उर्फ शंकर बोचरे व त्याचा मुलगा हरीश बोचरे यांनी कर्मचाऱ्या ना जास्त त्रास देणे सुरु केल्याचा आरोप करण्यात येत आहे शिक्षण सारख्या संस्था मध्ये कर्मचाऱ्या ना वेठीस धरणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थीत केल्या जात आहे.

गेल्या अनेक महिन्या पासुन या संस्था मधील कर्मचायाचे वेतन हेतुपुरस्पर पणे न दिल्याने या महविद्यालयाचे कर्मचारी आर्थिक संकाटा सोबत झुंजत आहे कोरोना सारख्या महामारी आपल्या परीवाराचा उदरनिवाह कसा चालवावा असा प्रश्न कर्मचाऱ्या समोर आहे संस्था चालका कडुन कर्मचाऱ्या चा  मानसिक छळ असल्याचा आरोप या महाविद्यालयाचे कर्मचारी करीत आहे.

संस्थाचालक शंकर बोचरे व हरीश बोचरे यांच्या कारभारा मुळे कर्मचारी मेटाकुटीस आले आहे.विशेष म्हणजे या महाविद्याच्या संस्थाचालकानी १ जानेवारी २० ते ३० जुन २० या कालावधी मध्ये विना प्राचार्य महाविद्यालय चालविण्यात आले आहे.या मुळे या महाविद्यालयाच्या आर्थिक भष्ट्राचाराची सुध्दा चौकशी करण्यात यावी अशी चर्चा आहे.

एख्याद्या शिक्षण संस्थेचे महीला कर्मचाऱ्या चा संस्थाचालका कडुन विनयभंग होणे ही शिक्षण क्षेत्रा करीता काळीमा फासणारी बाब असुन महात्मा फुले विज्ञान व कला महाविद्यालाय्या संस्था चालक सुभाष उर्फ शंकर बोचरे व त्याचा मुलगा हरीश बोचरे यांच्या सर्व कारभााराची सखोल चौकशी करुन या महाविद्यालयात कर्मचाऱ्या चा होत असलेला आर्थिक व मानसिक छळ थाबविण्याची मागणी होत आहे. 

सदर महाविद्यालय सुरु करण्यात आल्या नंतर कोणतेही अनुदान नसल्याने  विना वेतन काम करुन  या महाविद्यालया करीता झटनाऱ्या  एका कर्मचाराला नौकरीवरुन काढुन टाकण्याचा प्रताप या पिता पुत्रानी केला आहे.

आपले आयुष्य उध्दवस्त होत असल्याने पुन्हा नौकरीवर घेण्याची विनंती करण्याऱ्या त्या कर्मचाऱ्यांना कोणतेही गय न करता उलट आपल्या मुलाला स्वताच्या संस्थे मध्ये कायम करण्या करीता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.विना वेतन काम करुन संस्थेला जिवंत ठेवणानाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटावर गदा आणानाऱ्या या संस्थेची सखोल चौकशी  होणे गरजेचे आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here