ते भविष्यातही जपूया समरजितसिंह घाटगे यांचे प्रतिपादन… ऊस पिकपरिसंवादास सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
राहुल मेस्त्री
शाहू साखर कारखान्याच्या स्थापनेपासून सीमा भागातील शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे साथ दिली आहे. स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यापासून या शेतकऱ्यांचे व शाहूचे ऋणानुबंध जुळले आहेत. ते भविष्यातही जपूया. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंहराजे घाटगे यांनी केले.
सौंदलगा ता. निपाणी येथे झालेल्या ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते. कोगनोळी सेंटर कडील दहा गावातील शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने या परिसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहून उत्सफुर्त प्रतिसाद दिला.
श्री.छत्रपती शाहू साखर कारखान्यास व्ही एस आय पुणे यांना ऊस विकाससाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन समरजितसिंहराजे घाटगे यांचा सभासदांच्या वतीने ज्येष्ठ संचालक,कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांचा सत्कार सौ.आशाराणी वीरकुमार पाटील यांनी केला.

यावेळी श्री. छत्रपती शाहू कृषी संघाच्या बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला. श्री.घाटगे पुढे म्हणाले,शाहू साखर कारखाना संपूर्ण देशात नावाजलेला म्हणून ओळखला जात आहे. यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे. या यशाचे सभासद शेतकरी हेच मानकरी आहेत.असेही ते म्हणाले.
शाहू साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, शाहू कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू परिवारामध्ये सीमाभागातील शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन न्याय दिला आहे त्यामुळे शाहूच्या परिसरातील शेतकऱ्यांप्रमाणे या शेतकऱ्यांनाही लाभ मिळत आहेत.
शाहूची सभासदाभिमुख गौरवशाली परंपरा त्यांच्या पक्षात विद्यमान चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनीही पुढे सुरू ठेवली आहे. भविष्यात त्यांच्या पाठीशी सीमाभागातील शेतकरी ठाम पणे राहतील. यावेळी शशिकांत पाटील व सौ.सुनिता कोंडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर कारखान्याच्या संचालिका व शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, आशाराणी पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.स्वागत व पाहूण्यांची ओळख ऊस विकास अधिकारी के.बी पाटील यांनी करून दिले.आभार व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी मानले.