भूकंपाविषयी जनजागृती साठी महसूल कर्मचाऱ्यांची प्रांत अधिकारी असीमा मित्तल यांनी घेतली बैठक…अनेक उपाय योजनांवर विचार…

डहाणू – जितेंद्र पाटील

पालघर जिल्हयामध्ये डहाणू व तलासरी तालुक्यामध्ये सतत होणाऱ्या भूकंपामुळे नागरिका मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे,त्या करिता आज ता. 11 रोजी धुंदलवाडी येथे भूकंम्प क्षेत्रातील तलाठी, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन विविध उपाययोजना वर विचार केला गेला.

त्या मध्ये खालीलप्रमाणे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तरी नागरीकांनी काही आपत्ती झाल्यास अगर आपत्ती विषयक काही सूचना दयावयाचे झाल्यास खालील नमूद मोबाईल क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.

तहसिल कार्यालय तलासरी नियंत्रण कक्ष मोबाईल क्र. ९६३७६९२१२७ सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, पालघर जिल्हयातील डहाणू व तलासरी

तालुक्यामध्ये काही दिवसापासून सातत्याने होणाऱ्या भूकंपाच्या धक्यामुळे घाबरून जाऊ नये. या साठी प्रशासनाच्या

वतीने प्रसारित होणाऱ्या सूचनांचे पालन करुन या आपत्तीवर मात करु शकतो. भूकंप झाल्यास मोकळया मैदानात त्वरीत जावे. घरातील लाईट व गॅस अथवा चूल बंद करावे बाहेर जाणे शक्य नसल्यास

टेबलच्याखाली आश्रय घ्यावा. लाईटच्या वायरांना हात लावू नये.

प्रशासनातर्फे भूकंप विषयक आपत्तीचा सामना करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना

करण्यात आलेल्या आहेत. १. प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यान्वित करण्यात आलेल्या

आहेत.
२. नागरी संरक्षण दल (CDS) यांच्या द्वारे प्रत्येक गावामध्ये भूकंप आपत्ती विषयी जनजागृती

शिबीरे आयोजित करण्यात आलेली आहेत.
३. भूकंप प्रवण गावामधील लोकांसाठी मोकळया मैदानामध्ये ठिकठिकाणी पक्के तंबू (Tents)
उभारण्यात आले आहेत.

४. भूकंप आपत्ती झाल्यास कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी मॉक ड्रील (Mock
Drills) चे आयोजन करण्यात येणार आहे.

५. भूकंप आपत्तीमध्ये काय करावे आणि काय करु नये याविषयी दृकश्राव्य (Audio & Video) माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

लवकरच या सर्व उपाययोजना भूकंम्प क्षेत्रात राबविण्यात येणार आहेत, या वेळी उप जिल्हाधिकारी असीमा मित्तल, डहाणू तहसील दार राहुल सारंग, महसूल कर्मचारी,तलाठी,ग्रामसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here