आलेगांव पोलीस चौकीत कोरोना संदर्भात सभा संपन्न…

पातूर( तालुका प्रतिनिधी ) आलेगांव परिसरातील पिंपळखुटा,मळसुर येथील कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता आलेगांव ग्रामस्थाना कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये.या अनुषंगाने चांनी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गणेश वनारे यांनी आलेगांव ग्रामपंचायतचे पदाधिकारी,

सदस्य व प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये सोशल डिस्टनसिंग ठेऊन सभा घेऊन ग्राम सुरक्षे करिता ठाणेदार वनारे यांनी ग्रा.पं, प्रशासनासह गठीत समितीला सूचना दिल्या.

कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनासह विविध प्रशासने कार्यमग्न आहेत.शहरी भागामध्ये असलेला कोरोना आजाराचा प्रादुर्भाव खेड्या पाड्यामध्ये पसरत चालल्याने विविध प्रशासना समोर चिंतेचा विषय बनला आहे.सदर आजाराचा प्रादुर्भाव इतर गावांमध्ये होऊ नये

या अनुषंगाने चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे यांनी आलेगांव पोलीस चौकिमध्ये ग्रा.पं.प्रशासनाचे पदाधिकारी,सदस्य,तलाठी व गठीत समिती,प्रतिष्ठीत नागरिक व पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये दि ३० रोजी आलेगांव पोलीस चौकिमध्ये सभा घेऊन

आलेगावामध्ये दैनंदिन होत असलेल्या गर्दीला,तसेच विना मास्क फिरणाऱ्याना रोख लावावा तसेच व्यापारी दुकानदार यांना वेळेचे बंधन लावून होणाऱ्या गर्दीला आळा घालावा.अशा सूचना दिल्या तसेच पोलिसांची गरज भासल्यास दोन पोलीस कर्मचारी मदती करिता देऊ असे सभे मध्ये सांगितले.

या वेळी ग्रा.पं, सरपंच,ग्रा.पं, सदस्य,तलाठी,प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार मंडळी उपस्थित होते.ठाणेदार यांच्या सुचनेला ग्रा.पं, प्रशासनासह उपस्थित मंडळींनी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदर सूचना योग्य असल्याचे मान्य करून आलेगावातील ग्रामसुरक्षे करिता कडक निर्बंध लावले जातील असे एकमताने ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here