लॉंकडाऊन बाबत कोगनोळी ग्रामपंचायत मध्ये व्यापारांची बैठक…

राहुल मेस्त्री

कर्नाटक शासनाने कोरोणा व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे गांभीर्य घेऊन राज्यात पंधरा दिवसाचे लाँकडाऊन केले आहे.या संदर्भात कोगनोळी ता.निपाणी येथील ग्रामपंचायत मध्ये माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज विरकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली लॉकडाऊन कशा पध्दतीने पाळण्यात यावे याबाबतचे काटेकोर नियमावली तयार करून

व्यापाऱ्यांना तशा प्रकारच्या सर्व सूचना अमलात आणण्याचे आवाहन या वेळी पंकज पाटील यांनी उपस्थित व्यापारी वर्ग व ग्रामस्थांना केले.. यावेळी पुढे बोलताना पंकज पाटील म्हणाले की लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे, गावातील व्यापाऱ्यांनी सकाळी सहा ते दहा या वेळेतच आपली दुकाने सुरु ठेवावेत, अत्यावश्यक सेवा वगळता

बाकीची सर्व दुकाने बंद ठेवण्यात यावीत, या ठिकाणी विक्रीसाठी बसणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून बसावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, नागरिकांनी गावातून अत्यावश्यक असले तरच बाहेर पडावे, मास्क वापरावे व कोरोनाची दुसरी साखळी तोडून सर्व ग्रामस्थांनी स्वतःचे संरक्षण स्वतः करावे असे अहवान केले..

या बैठकीत स्वागत प्रास्ताविक ग्रा.पं.सदस्य तात्यासो कागले यांनी केले.या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी धनंजय पाटील कृष्णात खोत दिलीप पाटील , राजगोंडा टोपान पाटील, , संजय पाटील, दादासाहेब मानगावे, रामा गाडेकर, , विश्वजीत लोखंडे, संजय डूम,कोगनोळी भाजपा प्रमुख कुमार पाटील,सुनिल माने,सुजीत माने ,

बबन पाटील, रईस मुल्ला, भुषण पाटील, जीवन सांगले, अनिल पाटील यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य गावातील व्यापारी, ग्रामस्थग्रामपंचायतीचे कर्मचारी रामा जाधव शिवलिंग दिवटे डी बी च्यावर शर्मिला हळीजवाळे इत्यादी उपस्थित होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here