बिलोली येथे वन कामगारांचा विविध प्रश्ना वर बैठक…

मदनुर – दतुंलवार सोपान मरखेलकर

नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे वन व सामाजिक वानिकरण बारमाही कामगारांच्या प्रश्ना वर मराठवाडा सर्व श्रमिक संघटना महाविर नगर नांदेड चे अध्यक्ष कॉ. बि . के. पांचाळ यांच्या अध्यक्षता खाली बैठक संपन्न झाली या बैठकित अनेक प्रकार च्या प्रश्ना वर चर्चा करण्यात आले यात प्रमुख प्रश्न आशोक गोविंद मदळे रा. शेवाळा ता देगलुर हा सन. १९९४ पासुन वन विभागात कार्यरत असताना आणि केस क्रमांक यु एल पी ६८८/९४ कोर्टा ने नोकरित कायम करण्याचे अंतरिम आदेश झाले असताना,

सुध्दा या जुन्या वन कामगांराना वगळून त्याच्यां कुटुंबा वर उपास मारिचे प्रश्न तयार केले आहे आणि दुसरे नविन वन कामागारास कामावर घेतल्याची बाब देगलुर वन परिक्षेत्रात घडली आहे आणि वन कामगारांना मा. कामगार आयुक्त मुंबई यांचे सन. २०२० आणि दिनांक०४/०८/२०२१ जाहिर केलेले विशेष वेतन प्रमाणे सर्व कामागांराना देण्यात यावे आणि वन कामगारांचे थकित वेतन दिवाळी पूर्वी देण्यात यावे आदी विषया वर चर्चा करण्यात आले.

यावेळी देगलुर, नरसी, नायगांव, बिलोली चे वन कामगार कॉ.मोरे भोकर, कॉ. दंतुलवार देगलुर, कॉ. ठाकुर बिलोली, कॉ.लच्छीराम देगलुर शेषाबाई, गंगाराम सोनकांबळे, मारोती बतुलवार, हुलबा वाघमारे भारी संख्या मध्ये महिला – पुरुष वन कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here