उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली तपासणी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली भेट…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांबाबत रस्त्याचे काम विनाविलंब व्हावे याकरिता तेल्हारा शहरातील युवक विशाल नांदोकार यांनी 26 जून पासून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय तेल्हारा येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली.

यावेळी उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन वैद्यकीय तपासणी केली यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय तेल्हारा चे उपविभागीय अभियंता यांनी उपोषणस्थळी भेट देवून 15 जुलै पासून विकास कामे सुरु करू असल्याचे सांगितले व उपोषण मागे घेण्यासाठी संगीतले असता नांदोकार यांनी त्यांची विनंती अमान्य केली.

तेल्हारा तालुक्यातील जीवघेण्या रस्त्या करिता विशाल नांदोकार या युवक 26 जून पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असता आज 27 जून ला त्याची प्रकृती ढासळल्यामुळे स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली तसेच आज उपोषण स्थळी अनेक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षक वृंद, एस टी महामंडळाचे कर्मचारी कृषी व्यवसायिक शहरातील व्यावसायिक आदिनी उपोषणस्थळी भेट देऊन विशाल नांदोकार यांच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला यावेळी आज सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे उपविभागीय अभियंता यांनी आज उपोषण स्थळी भेट देऊन विशाल नांदोकार यांनी रस्ते दुरुस्ती बाबत सध्याच्या परिस्थितीमध्ये तालुक्यातील विभागातील कामे सुरू होणे शक्य नसल्यामुळे तातपुर्ति,

मुरुम टाकने, गिट्टी टाकने चे डाग डुगीचे कामे करण्यात येतील असे सांगून 15 जुलै पासून सदर रस्त्याचे कामे सुरू करण्यात येईल तरी आमरण उपोषण मागे घ्यावे असे पत्र उपविभागीय अभियंता यांनी नांदोकार यांना दिले असता नांदोकार यांनी तालुक्यातील चारही भागातील रस्त्यांची विकास कामे परिपूर्ण पणे जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here