शहरातील बहुचर्चित मांस विक्रि,मटन खानावळ,अवैद्य दारू विक्री व्यवसाय हटवण्याच्या अर्धवट कार्यवाही विरोधात ६१ महीलांचा आत्मदहनाचा इशारा…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर शहरातील अंबेजोगाई रोड, मारोती मंदिर व तिपन्ना नगर परिसरात मागील चाळीस वर्षापासून जवळपास पन्नास लोक बैल,बकरा,कोंबडा,मासे या प्राण्यांचे मांस विक्री मटन खानावळी व्यवसाय करतात. त्यामुळे या परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने परीसरातील रहिवाश्यांनी आरोग्यास धोका होत असून दुर्गंधी निर्माण झाल्याचे सांगून सर्व हे व्यवसाय हटवण्यात यावेत म्हणून परिसरातील रहीवाश्यांनी वेळोवेळी निवेदने दिली होती.

या निवेदनाची प्रशासनाने दखल घेऊन दि १४ सप्टेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात मांस विक्रि व्यवसाय तसेच अतिक्रमने हटवली होती पंरतु लोकांनी सदरील व्यवसाय पुन्हा परत त्याच ठिकाणी सुरू केले असुन प्रशासनाच्या या अर्धवट कार्यवाहीच्या विरोधात परिसरातील ६१ महीलांनी हे व्यवसाय हटवण्यात यावेत यासाठी जिल्हाधिकारी लातुर यांना निवेदन देऊन दि १२ आक्टोंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे

याविषयी सविस्तर माहीती अशी की,वर्षानुवर्षे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा आमच्या घरासमोर उघड्यावरती चालत असलेले मटन मार्केट आणि उघड्या वरती चालत असलेली अवैद्य दारू विक्री वर आज पर्यंत तरी  कोणतीही कार्यवाही केली गेली नाही आणि दि १४ सप्टेंबर रोजी मटन मार्केट केलेली कार्यवाही अर्धवट करून प्रशासनाने आमची फसवणूक केलेली आहे कारण परत सर्वांनी रस्त्यावरती मटन,चिकन, बिफ आणि मटन खानावळी अवैद्य दारू विक्री चालू ठेवली आहेत. 

याबाबत दररोज नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवुण सुद्धा त्यांच्यावर कोणतीही ही ठोस कार्यवाही केली जात नाही प्रशासनाने खोटे आश्वासन देऊन आमची फसवणूक केली आहे आता आम्हाला कळून चुकले आहे आम्ही दलित वडार आहोत म्हणून आमच्या तक्रारींकडे सारखे दुर्लक्ष केले जाते आणि आमच्या या तक्रारींची दखल घेतली जात नाही  
घरासमोर चालत असलेल्या मटन मार्केटच्या घाणीमुळे आमची लहान मुले व वयोवृद्ध वारंवार आजारी पडत आहेत याचे जबाबदार येथील स्थानिक प्रशासन आहे.

जेव्हा आम्ही स्वतः जाऊन मटन विक्रेत्यांना दुकाने बंद करण्यास सांगतो तेव्हा ते आम्हाला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतात आणि स्त्रियांच्या अंगावरती धावून येतात आता हे आम्हाला सहन होत नाही या प्रताडनेला आम्ही आता कंटाळलो आहोत आमच्या घरासमोर खुले आम अवैद्य दारू विक्री केली जाते,

आणि रस्त्यावरती ती पिली जाते लोक दारू पिऊन नशेमध्ये आमच्या घरा समोर अभद्र चाळे करतात आणि खुले आम लघु शंका करतात येता जाता महिलांची खेड काढली जाते आणि कधी कधी तर नशेमध्ये घरात घुसण्याचा प्रयत्न पण करतात.या घाणेरड्या वातावरणामुळे आमच्या स्त्रियांच्या अब्रूस धोका निर्माण झाला आहे उद्या जर येथे एखाद्या स्त्रीच्या अब्रूची बरे वाईट झाले तर त्याचे जिम्मेदार सुद्धा स्थानिक प्रशासन असेल दलित वडार वस्ती आहे म्हणून आमच्याकडे सारखे दुर्लक्ष केले जात आहे.

पाच वर्षे आमच्या घरासमोरच्या नाल्या नगरपालिका कधी साफ करत नाही अर्ध्या शहराला पिण्याचे पाणी पंधरा दिवसाला भेटत असताना आम्हाला ४० ते ५० दिवसाला का प्रशासनाने सांगावे आम्ही जगावे तरी कसे प्रशानाच्या नियमाप्रमाणे सामाजिक आणि धार्मिक स्थळापासून १५० मीटर पर्यंत कत्तलखाने मांस विक्रीची दुकाने कायद्याने गुन्हा आहे तरी नगरपालिकेने हे मटन मार्केट बांधून आणि खुल्या जागेवरती मास विक्री व मटन खानावळ न बंद करून स्वतःहून शासनाचे नियम मोडले आहेत.     

एकीकडे उत्तरेस ग्रामदैवत हनुमान मंदिर आणि भाजी मंडई आहे तर पूर्वेकडे आई अंबाबाईचे मंदिर आणि तिपन्ना नगर रहिवाशी यांचा परिसर आहे हे सर्व मार्केट पासून १०० मीटरच्या आत आहे. हे सर्व माहीत असून सुद्धा मार्केट बनवून उघड्यावरती मांस विक्रीला आळा न घालून आमच्या लहान व वयोवृद्ध लोकांचे जीवन व स्वास्थ्य धोक्यात घातले आहे.

आम्ही आता वारंवार प्रशानाकडे न्यायासाठी हात पसरून थकलो आहोत आणि या जाचाला कंटाळून गेलो आहोत या वातावरणामुळे आम्हाला भीती वाटू लागली आहे मटन मार्केटच्या घाणीमुळे आम्हाला श्वास घेता येईना घरांच्या खिडक्या उघडता येत नाहीत मटण विक्रेते रस्त्यावर येता-जाता अभद्र भाषेचा उपयोग करून महीलांची छेडछाड करतात यामुळे आम्हाला आणि आमच्या वयात आलेल्या मुलींना घराबाहेर पडण्याची भीती वाटत आहे याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरही पडत आहे. 

असे रोज रोज घुठून घुठून राहण्यापेक्षा मेलेले बरे जर आमचे वृत्त झालेले शरीरांना बघूनच प्रशानाचे डोळे उघडणारा असतील तर आम्ही ते पण करू म्हणून आम्ही सर्व तिपन्ना नगर मधील महिलांनी ठरवले आहे की अर्जामध्ये नमूद केलेल्या तारखेच्या अगोदर जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर सर्व तिपन्ना नगर मधील महिलांनी ठरवले आहे,

की या जाचाला कंटाळून दि १२ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय अहमदपूर समोर सर्व ६१ महिला सामूहिक आत्मदहन करणार आहोत आणि आमच्या आक्रोशातून आणि मजबूरीतुन दिलेल्या निवेदनाला प्रशासनाने आमची पोकळ धमकी समजून दुर्लक्ष करू नये जर उद्या आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल आम्हाला एवढे मोठे पाऊल उचलण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आमच्याकडे केलेले दुर्लक्ष कारणीभूत आहे,

आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय पातळीच्या आंदोलनाला आणि वडार समाजाच्या रोषाला पुढे जाण्याची तयारी स्थानिक प्रशासनाने ठेवावी असे निवेदन जिल्हाधिकारी लातुर यांना देण्यात आले आहे सदरील निवेदनावर ६१ महीलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here