सांगली महापालिकेच्यावतीने महापौर आपल्या दारी मोहीम राबविणार…

सांगली प्रतिनिधी ज्योती मोरे

सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दिनांक 7 फेब्रुवारी पासून महानगरपालिका ” महापौर आपल्या दारी हि मोहीम राबवण्यात येत आहे.अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

महापालिका क्षेत्रातील वीस वार्डातील मध्यवर्ती ठिकाणी एकत्र येऊन या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.यावेळी महापौर,उपमहापौर,सहाय्यक आयुक्त,स्वच्छता निरिक्षक आणि त्या त्या ठिकाणचे नगरसेवक उपस्थित राहणार असून,याठिकाणच्या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान या मोहिमेची सुरवात अंबा चौक ,यशवंतनगर,कुपवाड येथून होणार असल्याची माहितीही महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी पुढे बोलताना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here