बृहन्मुंबई महानगरपालिकेने जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाला दिलेल्या जागेचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन…

मुंबई – गणेश तळेकर

जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नाटकाच्या बसेस तसेच नाटकाचे सेट व साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने जी/ उत्तर विभागातील कोहिनूर प्लाझा येथील वाहनतळाची जागा माफक दरात उपलब्ध करून दिली आहे.

या वाहनतळामधील जागेचे उद्घघाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज दि.०५ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडले. याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, नगरसेवक श्री. अमेय घोले, नगरसेविका श्रीमती प्रीती पाटणकर, माजी आमदार श्री. नितीन सरदेसाई, अभिनेते श्री. अशोक सराफ श्री.प्रशांत दामले, जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष श्री. अमय खोपकर, मोहन जोशी उपस्थित होते.

जी /उत्तर विभागातील वाहनतळातील ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर, श्री.अनिल त्रिवेदी, श्री. संदीप कदम, श्री. राजेंद्र चव्हाण यांनी सहकार्य केले. मोहन जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here