Exclusive । मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय उठलंय विद्यार्थ्यांच्या जीवावर… कोरोनाकाळातही सर्रास सुरू आहे शाळा…

अमरावती – दिनांक 5/6/2021 रोजी सहजच प्रत्येक कोरोनाच्या अनुषंगाने शाळेची व्यवस्था व कार्यप्रणाली पहायचे ठरविले व त्या अनुषंगाने आमच्या वार्ताहर प्रतिनिधी सोबत चर्चा करून त्यांना प्रत्येक शाळेचा दौरा करावयास सांगितले असता, स्थानिक प्रभु कॉलनी स्थित यशोदा नगर येथील “मातोश्री क्रुष्णाबाई देशमुख” इयत्ता पाचवी ते दहावी ची अवस्था,

व्यवस्था व कार्यप्रणाली पाहुन आमच्या प्रतिनिधीच्या तोंडचे पाणीच पळाले, कारण राज्य शासनाचे व शालेय शिक्षण मंत्र्यांचे कडक दिशानिर्देश असताना सुद्धा मात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहोड आपल्या मनमर्जिने शाळा चालुच ठेवत नाही आहेत तर, प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांला दमदाटी करून शाळा सुरळीतपणे चालु ठेवीत आहे.

आमचे वार्ताहर प्रतिनिधींनी श्री मोहोड यांच्याशी संवाद साधले असता मुख्याध्यापक महोदयांनी स्पष्टपणे बोलुन दाखविले की, माझे कोणीही काहीही वाईट करू शकत नाही तसेच कलेक्टर व शिक्षण मंत्र्यांंचा आदेश मानायला मी काही त्यांचा लाजीम नाही, मी या शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने या शाळेच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याचा मला पुर्ण अधिकार आहे व तो मी माझ्या मनमर्जिने घेईल.

तसेच आमच्या वार्ताहर प्रतिनिधीने मुलांच्या आरोग्या विषयी मा. मुख्याध्यापक यांची प्रतिक्रिया जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता मा. मुख्याध्यापक मात्र त्या विषयी जास्त गंभीर दिसले नाही. कोरोना वगैरे काहीही नसुन ती फक्त एक जुमलेबाजी आहे, असे मुख्याध्यापक मोहोड म्हणाले.

आज जिथे अमरावती नव्हे, महाराष्ट्र नव्हे, सगळ्या जगभरात ज्या कोरोणाने त्राही त्राही माजविली आहे तिथे एका सुशिक्षित व जवाबदार व्यक्तीच्या तोंडुन हे वाक्य व कोरोनाविषयीचे विचार ऐकून यावर अजून काय बोलावे हे कळायला मार्ग नाही. आमच्या प्रतिनिधीने शाळा व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला तो आपल्या करिता सादर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here