चक्का जाम आंदोलन, भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा चे वतीने भव्य चक्का जाम आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

महाविकास आघाडी सरकारनं मिरज शहरातील व ग्रामीण भागातील पूरग्रस्त नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत देऊन थट्टा करण्याचं काम चालवलं आहे. एक मिरजकर आणि पुरग्रस्त नागरीक म्हणून आम्हाला भीक नको तर आमच्या हक्काची मदत हवी आहे.अशी प्रतिक्रिया मिरजेचे आम.सुरेश खाडे यांनी व्यक्त केलीय.

२०१९ सालच्या महापुरानंतर तत्कालीन फडणवीस भाजप सरकारने पूरग्रस्त नागरिकांना घरटी १५ हजार रुपये आणि पूरग्रस्त व्यापाऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत तातडीने दिलेली होती परंतु २०२१ साली आलेल्या महापुरानंतर ठाकरे पवार सरकारने पूरग्रस्त नागरिकांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली आहेत.

तरी या आपल्या हक्कासाठी व महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ सर्व पूरग्रस्त भागातील नागरिक,व्यापारी व छोटे मोठे व्यावसायिक यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने व नागरिकांचे वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे पश्चिम महाराष्ट्रात संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे‌ यांची नेतृत्वाखाली तसेच अनुसुचित जाती प्रदेश सरचिटणीस मोहन वणखंडे सर, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी,महादेव अण्णा कुरणे, माजी महापौर, ओबीसी राष्ट्रीय सदस्या संगीता खोत,

माजी सभापती पांडूरंग कोरे, माजी उपमहापौर आनंद देवमाने, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक शिवाजी दुर्वे, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, ओबीसी प्रदेश चिटणीस जयगोंड कोरे, शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर , राजेंद्र नातू, ग्रामीण अध्यक्ष शंकर शिंदे, परसू बापू नागरगोजे, उमेश पाटील, अरुण राजमाने, ओमकार शुक्ला, गजेंद्र कुल्लोली, दिगंबर जाधव, सुमेध ठाणेदार, ईश्वर जनवाडे, पंकज म्हेत्रे, रविकांत साळुंखे,

शानावज सौदागर, शंकर इसापुरे, धनंजय कुलकर्णी, अमोल सूर्यवंशी,असगर शरिकमसलत, खुद्बबुद्दिन काझी, श्रीकांत महाजन, शिवलिंग मेंढे, महेश दह्यारे, रमेश मेंढे, भालचंद्र साठे, अजिंक्य हम्बर, सुशील माळी,राज कबाडे, उमेश हारगे, महेश फोंडे, आश्विन कोरे, जयश्री ताई कुरणे, रुपाली गाडवे, साधना माळी, अनिता हारगे, लतिका शेंगने, अनुराधा जोशी, प्राजक्ता कुरणे,नयना कुरणे.गीता कुरणे, सुषमा मांगावकर,कविता चींचने शिवृद्र कुंभार, फिरोझ मुलाणी, सर्व पदाधिकारी व भाजपाचे कार्यकर्ते तसेच पूरग्रस्त नागरिक, व्यापारी या आंदोलनात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here