मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन…

चिल्हार बोईसर रस्त्यावर नागझरी नाक्यावर माकपच्या शेकडो कार्यकर्त्यांची निदर्शने.

मनोर – केंद्रीय गृहमंत्री,दिल्ली पोलीस आणि भारतीय जनता पक्षाने कारस्थान रचून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांचे दिल्लीच्या दंगलीत गोवल्याचा निषेध सोमवारी (ता.15) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा तर्फे नोंदवण्यात आला.

धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी लोकांनां जाणूनबुजून अडकवण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.सोमवारी साडे अकरा वाजताच्या सुमारास चिल्हार बोईसर रस्त्यावरील नागझरी नाक्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे दिल्ली पोलीस,

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप विरोधात घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.यावेळी जनवादी महिला संघटनेच्या हीना वनगा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव सुदाम धिंडा,पालघर शहर अध्यक्ष बबलु त्रिवेदी, सदू गुणगुणे, सखाराम पागी, अशोक तुंबडा, कमलाकर पावडे, चंद्रकांत दळवी,मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here