Saturday, April 20, 2024
Homeराज्यभाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात…३ भाविक ठार…७ जण गंभीर जखमी…शेगाव जवळील घटना…

भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात…३ भाविक ठार…७ जण गंभीर जखमी…शेगाव जवळील घटना…

Share

शेगाव : पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाला परतत असताना अगदी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळच मोठा अपघात घडला. आज सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारा वर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार तर 7 भावीक गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले.

यानंतर गंभीर जखमी असलेल्या भाविकांना पुढील उपचारार्थ अकोल्यात हलविण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झालायचे समजते. रात्री पासून हा प्रवास सुरु होता. आणि अगदी त्यांच्या घरापासून फक्त २ किलो मीटर अंतर बाकी होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: