कर्तव्यावर शहीद वनाधिकारी/वनकर्मचारी यांच्या कुटुंबियांच्या वारसास १ कोटी ची सानुग्रह निधी देण्याची मागणी…

अजय पाटील, केंद्रीय अध्यक्ष, म.रा. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना.

नागपूर – शरद नागदेवे

कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास गृह विभागाचे शासन निर्णयानुसार सानुग्रह अनुदान 25 लाख रुपये प्रलंबित प्रस्तावित मागणी मध्ये सुधारणा करून वनाधिकारी/वनकर्मचारी यांचा कर्तव्यावर मृत्यू झाल्यास 1 कोटी रुपये तसेच कायम अपंगत्व आल्यास 50 लाख रुपये देण्यात यावे अशी सुधारित मागणीकरिता मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), नागपूर यांना महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर चे शिष्टमंडळ अजय पाटील, केंद्रीय अध्यक्ष यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली.

सदर शिष्टमंडळाचे भेटीदरम्यान नवीन सुधारित प्रस्तावात खालील मुद्दे सामील करण्याबाबत अजय पाटील यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) मा. साईप्रकाश गंटी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.वनसंरक्षनाचे कर्तव्य पार पाडताना कोणत्याही वनाधिकारी/वनकर्मचारी यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना शहिद व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी देय असलेले अंतिम वेतन त्या शहीद वनकर्मचारी यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती पर्यंत देय राहील.

त्याचप्रमाणे कर्तव्य पार पाडत असताना कोणताही वनाधिकारी/ वन कर्मचारी यांचा मृत्य झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मृत व्यक्ती जणू काही मृत झाली नव्हती असे मानून सदर व्यक्तीला सेवेत असताना, सदर व्यक्ती मृत्यूच्या वेळी जे पद धारण करीत होती.

त्या पदावरून वरीष्ठ पदावर पदोन्नती साठी ज्या ज्या वेळी पात्र असेल त्या त्या वेळी सदर व्यक्ती पदोन्नत झाले असे गृहीत धरून त्या व्यक्तीचे वेतन निश्चिती करण्यात यावी आणि त्यानुसार पदोन्नती च्या पदावर निश्चित करण्यात आलेले वेतन मृत व्यक्तीच्या नियत वयोमानानुसार सेवा निवृत्तीपर्यंत देय राहील.

तसेच शहीद झालेले वनाधिकारी/वन कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना शहीद वनाधिकारी/वन कर्मचारी यांचे अंतिम वेतन वार्षिक वेतन वाढीसह देण्याबाबत प्रस्तावित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शहीद कुटुंबियांच्या वारसास कायम स्वरूपी शासकीय नौकरी प्रदान करण्याची मागणी करण्यात आली.

सदर शिष्टमंडळात विशाल मंत्रीवार केंद्रीय उपाध्यक्ष, भारत मडावी वृत्त अध्यक्ष चंद्रपूर, सतीश गडलिंगे, वृत्त अध्यक्ष नागपूर, विजय मोरे, कार्याध्यक्ष चंद्रपूर, विजय रामटेके, वृत्त सचिव , चंद्रपूर, ए. बी. गेडाम, विभागीय अध्यक्ष चंद्रपूर बफर, , आनंद तिडके, कैलास सानप, दिगंबर गोंदेवार , सुनील भोयर, रमेश आदमणे, कु. ललिता वरखड, कु. ममता पाकोडे, कु. प्रीती नागले, कु. राणी महल्ले, कु. सीमा दांडेकर इ. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here