कागल तालुक्यातील शेंडुर येथे २५ वर्षीय विवाहित महिलेने केली आत्महत्या…

राहुल मेस्त्री

कागल तालुक्यातील शेंडूर गावामध्ये आज रविवार दिनांक 21 रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान येथील ज्योती भिकाजी कांबळे या 25 वर्षीय विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत अधिक माहिती अशी की मयत व्यक्तीने घरात कोणी नसलेले बघून लहान मुलांच्या खेळण्याच्या दोरीने गळफास लावून आपला जीव संपवला आहे. ही घटना समजताच भिकाजी महादेव कांबळे यांनी कागल पोलिस ठाण्यात घडल्या प्रकाराची माहिती दिली.

घटना घडल्या ठिकाणी कागल पोलीस उपनिरीक्षक प्रीतमकुमार पुजारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली .सदर घटनेतील कारण अद्यापही स्पष्ट झालेली नासुन याबाबत पुढील तपास उपनिरीक्षक प्रीतम कुमार पुजारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here