अहमदपूरात पारंपारिक पद्धतीला फाटा देत शिवधर्म पध्दतीने शिवविवाह संपन्न…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर येथील मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.गोविंदराव शेळके यांनी समाजातील अनेकांचे विवाह शिवधर्म पध्दतीने लावून दिले. त्यामूळे त्यांनी आपल्या मुलीचे इंजि.केतकी व उमरगा जि.उस्मानाबाद येथील प्रा. प्रभाकर कावळे यांचे सुपुत्र आय .आय.टी.इंजि. राहुल यांचा रविवारी माळेगाव ( टेंभूर्णी ) येथे पांरंपारीक पध्दतीला फाटा देत अतिशय आदर्शवत पद्धतीने शिवविवाह संपन्न झाला.

या विवाह सोहळ्याचा साखरपुडा ही फोनवरच पार पडला. त्यामूळे अगदी साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला.सदरील विवाह हा शिवधर्म पद्धतीनुसार झाला असुन लग्नापर्यंत जो साखरपुडा, शाल अंगठी, कुंकू लावणे, मुंडासे बांधणे, मुहूर्त, पत्रिका, हुंडा, बस्ता, घोडा, शेवंती, रुकवत, आहेर,कपडे, मुळ चिठ्ठया, _डिजे, वरात अशा अनिष्ट प्रथा नाकारून या गोष्टींवरील जो अवाजवी खर्च केला जातो त्या खर्चाला फाटा देत लग्न अधिक सोप्या पद्धतीने कसे करता येईल याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे.

खोटया परंपरा नाकारल्याने लग्न खर्चाच्या भीतीमुळे समाजातील अनेक शेतकऱ्यांच्या व गोरगरीब जनतेच्या उपवर मुलींच्या व पित्याच्या आत्महत्त्या थांबन्यास मदत होणार आहे.या विवाहसोहळ्याचे वैशिष्टये म्हणजे शिवधर्म विवाहामध्ये भटजी नाही, होमहवन यज्ञ नाही,अक्षता ऐवजी टाळ्या व फुले व महागडया भेटवस्तू ऐवजी ‘ग्रंथभेट देऊन येणाऱ्या पाहुणे मंडळीचे स्वागत करण्यात आले.

कसल्याही प्रकारचा आहेर किंवा बडेजावपणा या विवाह सोहळयात करण्यात आला नाही. या विवाह सोहळ्यात संत तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, छञपती शिवाजी महाराज यांच्या आशिर्वादाने शिवविवाह संपन्न झाला. या शिवविवाह सोहळ्यात लातूर येथील शिवधर्म पिठाचे शिवसेवक इंजि.लिंबराज सूर्यवंशी यांनी वधू व वराला शिवशपथ देऊन विवाह सोहळा उत्साहात संपन्न केला.

अक्षतेच्या माध्यमातून अन्नाची नासाडी होत असते त्यामूळे अन्नाची अक्षता टाळून फुलांचा अक्षता म्हणून शिवधर्मात वापर केला जातो. तसेच सर्वांना समान अधिकार असल्यामूळे कोणीही विवाह लावू शकतो या भावनेतून भटजीला टाळून शिवधर्मामध्ये विवाहाची शपथ कोणीही देऊ शकतो. अशी शिवधर्मविवाह सोहळे आजपर्यंत १०० च्या वर लावून देण्यात आले.या शिवधर्म विवाहामूळे एका विवाहात जवळपास दोन ते तीन लाख रुपये खर्चाची बचत होत असते.

या शिवविवाहास महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम, माजी उपनगराध्यक्ष डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, प्रा.पी.टी. पवार, प्राचार्य बाबुराव जाधव,प्रा.दत्ता गलाले, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, माजी जि.प. सदस्य हेमंत पाटील,

आशिष गुणाले यांच्यासह विवाहसोहळा यशस्वीतेसाठी मोहीब कादरी, ज्ञानोबा भोसले, प्रदीप फुलसे, गोपाळ पाटील, मनोरथ पाटील, गोविंद शिळे, जयश्री पवार, सरोजा भोसले, तनुजा पवार आदी समवेत शिवप्रेमींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक ज्ञानोबा भोसले, शिवपंचके प्रा.डॉ.गोविंद शिळे व सरोजा भोसले यांनी तर आभार प्रा. गोविंद शेळके यांनी मानले.

तसेच सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती.कंबख्त कोरोना रोगामुळे आम्ही आपणास निमंत्रण देऊन आपले आरोग्य धोक्यात घालू इच्छित नाही. शेवटी आमच्या आनंदापेक्षाही आपले आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे शासनाच्या नियमाच्या अधीन राहून,सामाजिक बांधिलकी जोपासत,अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा उरकून घ्यावा लागला त्याबद्धल आम्ही दिलगीर आहोत.अशी प्रतिक्रीया वधु चे वडिल मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गोविंदराव शेळके यांनी दिली.

अहमदपूर – माळेगाव ( खु. ) येथे पारंपारिक पद्धतीला फाटा देत शिवधर्म पध्दतीने शिवविवाह संपन्न झाला यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गोविंदराव शेळके, प्रा. प्रभाकर कावळे, शिवधर्म पिठाचे शिवसेवक इंजि.लिंबराज सूर्यवंशी व वधु- वर आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here