संत ज्ञानेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे ,संस्था समन्वयक मानसी हाके यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

या प्रसंगी मुख्याध्यापक आशा रोडगे ,मुख्याध्यापक उध्दव शृंगारे सह शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते .या वेळी विविध ओनलाईन स्पर्धेत प्रथम ,द्वितीय,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.

या वेळी पालक कपिलेश्वर ढोले, संतोष गोरे, दिगांबर बोईनवाड ,संघमित्रा तिगोटे, स्वप्ना भालके, सरस्वती देवकते,मनिषा फुलारी व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन संगीता आबंदे व सतीश साबणे यांनी केले तर आभार मीनाक्षी तौर यांनी मानले‌. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here