रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वरच्या माळ्यात घरकुल द्या- पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे मंगेश कदम यांची मागणी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड शहरातील रमाई आवास (घरकुल) योजनेतून बी.एस.यु.पी घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना जागेअभावी वरच्या माळ्यावर (छतावर)घरकुल देण्यात यावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम यांनी केले आहे.

शहरात तरोडा परिसरात २००९ साली बी.एस.यु.पी योजने अंतर्गत नागरीकांना घरकुल बांधून देण्यात आले.होते.त्या काळात त्या लाभार्थ्यांच्या कुटुंबियांची संख्या कमी होती.परंतु आज काळी त्या कुटुंबियांची संख्या वाढली असून अनेकांचा मुलांची लग्ने झाली असल्याने कुटुंबाची सदस्य संख्या वाढली आहे.त्यामुळे त्या लाभार्थ्यांना सध्याची जागा अपुरी पडत आहे.

महानगरपालिका आयुक्तांना संबधीत प्रकरणी आदेशीत करून सदरील घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना घराच्या छतावर दुसरे घरकुल उपलब्ध करून दयावे अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम, काँग्रेस शहर महासचिव अँड धम्मपाल कदम,माजी सरपंच अरविंद सरपाते,युवक काँगेसचे विक्की गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here