कोगनोळी हद्दीत हुपरीच्या एका इसमाचा मृतदेह सापडला…

राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथील कोगनोळी हंचिनाळ रोडवरील कोंडार मळा नजीकच्या ओढयात तळगंदा,हुपरी ता.हातकणंगले येथील पत्रा स्क्रँप गोळा करणाऱ्या एका इसमाचा मृतदेह दि.28 रोजी मृतावस्थेत निदर्शनास आला.याबाबत अधिकमाहिती अशी की हुपरी येथील महम्मद बंडू जमादार वय वर्ष 50 हे दि.26 रोजी दुपारी 3:00 वाजल्यापासून पासुन बेपत्ता होते. नातेवाईकांनी संध्याकाळपर्यत वाट पाहुन महम्मद बंडू जमादार हे बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीने दि.27 रोजी हुपरी पोलीस स्टेशन मध्ये दिली.

पोलिसांनी याबाबत तपास करत असताना कोल्हापूर लोकल क्राईम ब्रँचने (एलसीबी) दोन अज्ञात संशयित आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपींनी सदर बेपत्ता महम्मद बंडू जमादार यांना ठार मारून कोगनोळी येथील कोगनोळी हंचनाळ रोडवरील ओढयात पतऱ्याच्या पेटीत बंद करून फेकले असल्याची माहिती दिली.यानंतर तात्काळ हुपरी पोलिसांनी आपल्या पथकासह कोगनोळी येथे घटना स्थळी येऊन मयत व्यक्तीच्या भावाच्या मदतीने पेटीतील व्यक्तीची ओळख पठवुन घेतली.

यावेळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत हुपरीचे पीआय राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची पेटी ओढ्यातून कुलूप लावलेले व बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला . नातेवाईकांना त्याची ओळख पटवून देण्यात आल्यानंतर शवविच्छेदनासाठी हुपरी येथे मृतदेह नेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे यांनी दिली.

कोगनोळी येथे बेवारस मृतदेह पेटीमध्ये आहे. याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली . नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यासाठी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएम गस्ती घटनास्थळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातून खून करून मृतदेह कर्नाटकात टाकण्या पाठीमागचा उद्देश संशयित आरोपींचा कदाचित वेगळा असावा. पण पोलिसांनी सदर संशयित आरोपींच्या मुसक्या आवळून गुन्ह्याचा तपास करण्यात यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल कोगनोळी सह हुपरी परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. कोगनोळी येथे मृतदेह टाकलेल्या ठिकाणी हुपरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोळी ,सचिन सावंत, दीपक कांबळे , चव्हाण ,जमादार आदी उपस्थित होते.

ही घटना समजताच कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व हुपरी पोलीसा सोबतचर्चा केली आणि आपल्या कडून शक्य ते सहकार्य करू असे सांगितले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here