अकोला शहरात शस्त्र घेवुन दहशत पसरविणारा ईसमास अटक…पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाची कारवाई…

अकोला – पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथकाची अकोला शहरात शस्त्र घेवुन दहशत पसरविणारा ईसमाकडून धारधार तलवार जप्त केली.दिनांक १८/०९/२०२० रोजी पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक हे अकोला शहरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांचे गोपनिय माहीतीदार यांने खात्री लायक माहीती दिली

कि एक ईसम हा सरकारी बगीचा अकोला चे परीसरात हातात लोखंडी तलवार घेवुन येणा जाणा-या लोकांना धाक दाखवुन दहशत निर्माण करीत आहे.अश्या मिळालेल्या माहीती वरूण पथकाने सरकारी बगीचा जवळ अकोला येथे लोकांमधे दहशत निर्माण करणारा ईसम नामे शेख निसार शेख नबी वय ३० वर्ष रा.हमजा प्लॉट अकोला यास ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी कडून एक लोखंडी तलवार जिची मुठ पिवळ्या धातुची ,जिची एकुण लांबी ३१ इंच पैकी मुठ ची लांबी ६ इंच व तलवारीची मुठीजवळ रुंदी /व्यास अडीच इंच अश्या वर्णनाची कि अं५००/-रू ची जप्त करण्यात आली आहे. नमूद कारवाई मा श्री जी.श्रीधर पोलीस अधीक्षक अकोला व मा श्री. प्रशांत वाडे अपर.पोलीसअधिक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मिलिंदकूमार अ.बहाकर पोलीस निरिक्षक विशेष पथक अकोला व त्यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here